आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: दुसऱ्याचा उद्योगही आपला होऊ शकतो...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ ऑगस्टच्या दिवशी मी सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका पाहत होतो. यात जेठालालने ध्वजाचे तीन रंग असलेला ड्रेस परिधान केला होता. बबिताने या ड्रेसचे डिझाइन जवळच्याच एका टेलरकडून करून घेतले होते, हे मी पाहिले आणि या वेळी माझ्या डोक्यात एक विचार आला, की अशा विशेष दिवसांच्या निमित्ताने अशाप्रकारचे खास डिझाइन केलेले ड्रेस बनवून आपले महत्त्व कायम ठेवले जाऊ शकते. मला वाटले टेलर कधीही बेकार राहता कामा नये, ते जर त्यांचे पंचांग घेऊन बसले तर ३६५ दिवसांसाठी उपयुक्त असे पोशाख हे स्पेशल दुकान चालवू शकतात. विशेष म्हणजे अशा बाजारात जिथे कपड्यांमध्ये ८० टक्के हिस्सा कपडे तयार करणाऱ्या कंपन्यांचा आहे. योगायोगाची बाब म्हणजे मी त्याच वेळी टेलरमेड नावाच्या मोबाइल अॅपचा लेख वाचला. कस्टममेड कपड्याच्या उद्योगाला हे अॅप उबेर टॅक्सी सेवेच्या अॅपप्रमाणे काम करून देशभरात संपुष्टात आलेल्या टेलरिंगच्या व्यवसायाला एक नवे रूप देण्याचा प्रयत्न करत आहे. 

टेलर मेड कसे काम करते? हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस स्तरावर अॅपच्या माध्यमाने उपलब्ध आहे. थोड्याच निवड प्रक्रियेनंतर तुम्ही कपड्यांना अल्टर करण्यापासून ते नवीन डिझायनर कपड्यांपर्यंतची सुविधा मिळवू शकता. वापरकर्ते कापड निवडून, मोजमाप करण्यासाठीचा वेळदेखील ठरवू शकतात. यानंतर टेलरमेड कडून एक कर्मचारी ग्राहकाकडे कपड्याचे माप घेण्यासाठी येतो, त्यानंतर तोच कर्मचारी आपण निवडलेले कापड जवळच्याच एका टेलरकडे देतो. यामध्ये वैयक्तिक गरज आणि आवडींकडे पूर्ण लक्ष दिले जाते. कारण कर्मचारी ग्राहकाकडे जाऊन त्यांची सगळी माहिती घेतो. महिला ग्राहक असेल तर त्यांना भेटण्यासाठी महिला कर्मचाऱ्यालाच पाठवले जाते. या कर्मचाऱ्यांना टेलरिंगचे प्रशिक्षण दिलेले असते. अॅपच्या मदतीने जवळच्या टेलरला कर्मचाऱ्याद्वारे रिक्वेस्ट पाठवली जाते. कर्मचारी ज्या ठिकाणी ऑर्डर घेण्यासाठी जातो, त्या वेळी ऑर्डरनुसार विशेष कपड्यांच्या शिलाईसाठी खास टेलरच्या नावांची यादीदेखील अॅपच्या सहायकाने ग्राहकाला दाखवली जाते. 
हे अॅप पिकअप, ड्रॉप आणि फॉलोअपची सुविधादेखील देते. या कंपनीची सुरुवात दुबई येथे स्थायिक असलेले भारतीय व्यावसायिक आसिफ कमाल (२७) यांनी केली आहे. त्यांचा परिवार कापड व्यवसायातच काम करतो. फक्त तीन आठवड्यांपूर्वी कंपनीने मुंबईतील १२ कर्मचाऱ्यांसोबत हे काम सुरू केले असून आत्तापर्यंत १२० ग्राहकांना त्यांनी सेवा दिली आहे. एका ऑर्डरची साधारण ९०० रुपये एवढी किंमत ग्राहकाला मोजावी लागते. 

टेलर वर्गाला हेदेखील माहीत आहे की भारतीय लोक लठ्ठपणा आणि डायबिटीसच्या कारणाने जास्त बेढब होत जातील आणि त्यात टेलरची भूमिका वाढेल. कारण त्यानुसार फिटिंगचे कपडे त्यांना शिवावे लागतील. मात्र, समस्या ही आहे की ग्राहकांना टेलरच्या दुकानापर्यंत आणायचे कसे? आसिफ कमाल यांना माहिती आहे की, सगळ्या जगात टेलर हे असंघटित आहेत आणि ते या व्यवसायाद्वारे त्यांना संघटित करू इच्छितात. मुंबईपासून सुरुवात केल्यानंतर या व्यवसायाला संपूर्ण भारतात आणि त्यानंतर या अॅपला ते लंडन, दुबई आणि सिंगापूरमध्येदेखील घेऊन जाणार आहेत. 

- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...