आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: इंद्रियांचे रक्षण करत ‘वाईटा’वर मात करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारताची एककथा आहे. कुरुक्षेत्र युद्धाचा सार समजावून सांगताना एक संत संजयला म्हणाले, ‘पांडव पाच इंद्रियांप्रमाणे आहेत. जेव्हा तुमच्या मनाचा रथ ईश्वर (श्रद्धा) चालवतो तेव्हाच तुम्ही १०० वाईटांशी (कौरव) लढून जिंकू शकता.’ कमी चर्चिली गेलेली ही कथा माझ्यासाठी अनमोल आहे. कारण जर आयुष्याच्या कोणत्याही पातळीवर समस्या भीती दाखवत असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या अंतर्मनात झाकून पाहा, असे ही कथा सांगते. वाईट गोष्टी हल्ला करत असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर त्या दूर करणे आवश्यक आहे आणि गरज वाटल्यास परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी शत्रूंवर हल्ला करा. आपल्या अंतर्मनात पाहण्याची ही थेअरी किंवा याचा काही भाग मेडिकल ट्रिटमेंटवर लागू करणे किंवा या थेअरीला थोडीशी विज्ञानाची जोड देणे निश्चितपणे कोणीही नवीन गोष्ट नाही, परंतु तरीदेखील खूप कमी लोक असे करतात. 

पहिली कथा : भुवनेश्वर शहरातील सत्यनगर येथील त्या दोन खोल्या पाहिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला ही प्ले स्कूल असल्याचे वाटेल, परंतु लक्षपूर्वक पाहिल्यास इथे सर्व वयोगटातील लोक वेगळ्याच उपक्रमामध्ये गुंतलेले दिसतील. आणखी ध्यान देऊन पाहिल्यास ते डोळ्यांचा योगा करताना दिसतील. भाग घेणारे डोळ्यांचे बुबुळ एका खास अंदाजात फिरवतात. हे लोक ग्लुकोमा, मोतीबिंदू, मायोपिया, कलर ब्लाइंडनेस किंवा प्रेस्बायोपियाचे रुग्ण आहेत. दोन महिन्यांच्या नियमित व्यायामानंतर क्लिनिकमध्ये उपस्थित अनेक लोक आपल्या दृष्टीमध्ये होणारा बदल अनुभवत आहेत. निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. गौरीशंकर गोस्वामी म्हणतात, ‘आम्ही अशा प्रकारे डोळ्यांची क्षमता वाढवत नाही, तर व्यायामाद्वारे दृष्टी ठीक करत आहोत.’ हा व्यायाम आपल्या देशामध्ये दीर्घकाळापासून केला जातो. तथापि, हे आसन अनेक आजारांवर उपयुक्त आहे, परंतु फार कमी लोकांनी याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलली आहे आणि लोकांची मदतही केली आहे. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या डोळ्यांच्या पेशींमध्ये व्यायामाच्या कमतरतेमुळे होतात. व्यायामाच्या अभावामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळे येतात. हे आसन प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच केले पाहिजे. हे मार्गदर्शक तुमच्याकडून ६० वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून घेतील. असे क्लिनिक अहमदाबाद, सुरत, वडोदरा, मुंबई, चेन्नई आणि पुद्दुचेरी येथे लोकांना आकर्षित करत आहेत आणि सर्जरी टाळण्यासाठी या थेअरीचा अवलंब करत आहेत. 

दुसरी कथा : केंद्र सरकारने गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची किंमत ५४ हजार ते ७५ हजार एवढी निश्चित केली आहे. यामुळे ऑर्थोपेडिक इम्प्लांटची किंमत जवळपास ६५ टक्क्यांपर्यंत कमी होईल. हे नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीच्या माध्यमातून होत आहे. मात्र, गुडघ्याचे प्रत्यारोपण टाळण्यास चालना देणारे लोकही खूप आहेत. स्ट्रोमल व्हॅस्क्युलर फ्रॅक्शन (एसव्हीएफ) थेरपीच्या बाबतीत असा दावा केला जातो की, इंदूरनंतर मुंबईत या आठवड्यामध्ये सुरू केली जाणारी ही पहिली थेरपी आहे. या थेरपीमध्ये ३०० ते ५०० एमएल फॅट हटवला जातो आणि तो सांध्यांमध्ये स्थापित केला जातो. हे बॉडी मास अल्ट्रासोनिक मशीनच्या माध्यमातून वेगळे केले जाते. या प्रक्रियेसाठी ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. रुग्णाच्या शरीराला कोणतीही इजा पोहोचवता त्याच दिवशी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे सांधेदुखी ३५ ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांमध्येही आढळून येत आहे. तथापि, हा आजार वयाच्या ६० वर्षांनंतर होतो. 

फंडा असा आहे की : इंद्रियआणि वाईट गोष्टींमध्ये नेहमीच संघर्ष होत आहे. आपण या वैज्ञानिक युगामध्ये याकडे कशा प्रकारे पाहतो हे आपल्यावर अवलंबून आहे. 

- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...