आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: कुणाच्या तरी प्रार्थनेमुळेच आपल्या चेहऱ्यावर आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या गुरुवारी प्रियम मेहता अहमदाबादच्या एमजी रोडवर आपल्या कारमध्ये सिग्नल सुटण्याची वाट पाहत होते. या वेळी गणेश चतुर्थीला पालदीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. तेवढ्यात एफएमवर सुरू असलेल्या रेडिआे जॉकी अर्चना जैनच्या आवाजाकडे त्यांचे लक्ष गेले. अर्चनाची सिग्नल स्टोरी सुरू होती. ही स्टोरी एक मिनिटापेक्षाही कमी वेळात संपते म्हणून मी या स्टोरीला सिग्नल स्टोरी म्हणतो. ही स्टोरी अशी होती... 

देव गणेश मंदिरातून दर्शन करून बाहेर येत आपल्या कारमध्ये बसत होते. तेवढ्यात एका छोट्या मुलाने त्यांना आवाज दिला. कारची काच वाजवून तो मुलगा म्हणाला, ‘साहेब, हा हार घेऊन गणेशाच्या दर्शनाला जा. तो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करील.’ देवाने कारची काच खाली घेत म्हटले, ‘नको, मी आत्ताच दर्शन घेऊन आलोय.’ हे म्हणत असतानाच देवाने आपल्या पाकिटातून १० रुपयांची नोट काढत त्या मुलाच्या हातावर टेकवली आणि गिअर टाकून पुढे जाऊ लागले. तेवढ्यात त्या मुलाने पुन्हा मागून आवाज दिला, ‘साहेब, पैसे तर तुम्ही दिले, हा हार तर घेऊन जा...’ देवाने पुन्हा आपल्या कारचे ब्रेक दाबले आणि त्याला म्हणाले, ‘मी हे पैसे माझ्या मर्जीने तुला दिले आहेत. मला दर्शन घ्यायला जायचे नाही. तूच दर्शनाला जा आणि हा हार देवाला घाल...’ एवढे म्हणत असताना त्यांनी पुन्हा अॅक्सिलरेटरवर पाय दाबला. तो मुलगा पुन्हा पळत-पळत मागे आला. ‘साहेब साहेब...’ हा त्याचा रट्टा सुरूच होता. आता मात्र देवाला राग आला. ऑफिसच्या मीटिंगला उशीर होत होता आणि हा मुलगा पिच्छा सोडत नव्हता. त्यांनी पुन्हा ब्रेक दाबले. त्यांचा राग त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. ताे मुलगा पुन्हा कारच्या काचेजवळ आला आणि म्हणाला, ‘साहेब, तुम्ही पैसे तर दिले, मात्र तुमचे नाव नाही सांगितले. देवाला हार घातल्यावर मी तुमचे नाव सांगेन ना, ते तुम्हाला आशीर्वाद देतील ना...’ आता मात्र देवाचा राग शांत झाला. इगो, चिडचिड सगळी एका क्षणात संपली. ते आपल्या कारमधून उतरले अाणि त्या मुलाजवळ जात म्हणाले, ‘अरे बाळा, अरे देवाने आपल्या सर्वांनाच सारखे बनवले आहे. देवाजवळ नाव कशाला हवे. गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, अशी प्रार्थना कर...’ एवढे बोलून देव पुन्हा आपल्या कारकडे वळले आणि निघून गेले. 
 
आरजे अर्चनाची ही कथा ऐकण्यात मेहता तल्लीन झाले होते. पाठीमागून एकापाठोपाठ एक येणाऱ्या हॉर्नच्या आवाजाने त्यांची तंद्री भंग झाली. तेव्हा सिग्नल सुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला फोन केला अाणि सांगितले की, ‘त्या अर्चनाला फोन कर आणि तिला विचार तू ही कथा का संपवलीस?’ मीसुद्धा अर्चनाला फोन करून तिच्या या कथेबद्दल तिचे कौतुक केले. खरेच आहे, आज आपल्या चेहऱ्यावर जो अानंद दिसतो तो कुणी तरी विश्वकल्याणासाठी केलेल्या प्रार्थनेचाच परिणाम असावा काय? असेलही... 

फंडा असा आहे की : अनेकजण असे आहेत की जे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. त्यामुळेच कदाचित आपला एखादा दिवस खूप आनंदात जात असावा. 

- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...