आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: मोबाइल अॅपमुळे लवकरच मोठे परिवर्तन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार असणाऱ्याप्रत्येक व्यक्तीला एकदा तरी पार्किंगच्या जागेची अडचण भासतेच. आपण केवळ जागेचाच शोध घेत नाही, तर पार्किंगची पावती देणाऱ्याकेडही बघत राहतो, पण तोदेखील दिसत नाही. खूप परिश्रमानंतर जागा मिळते तेव्हा कुठूनतरी पार्किंगवाला आपले पैसे वसूल करण्यासाठी पौराणिक कथांमधील पात्राप्रमाणे प्रकट होतो. आतापर्यंत कुठे होता, असे जेव्हा तुम्ही त्याला विचाराल तेव्हा तो हसेल आणि म्हणेल, ‘इथेच तर होतो साहेब.’ 

कोणतीही सेवा देता पैसे घेण्यासाठी प्रकट होणाऱ्या ‘कलियुगा’तील या पात्रांचा हा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या वर्षीच्या अखेरपर्यंत एक अॅप लाँच करण्याची योजना आखली आहे. कार कुठे पार्क करायची आणि किती पैसे लागणार, याची माहिती हा अॅप तुम्हाला मोबाइलवर सांगेल. यावर तुम्ही ऑनलाइन पेमेेंटही करू शकता. पैसे पार्किंग लॉटच्या खात्यामध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही दिलेल्या ठिकाणी गाडी पार्क करू शकता. सर्वात मोठा फायदा म्हणजे रिकामी जागा शोधण्यासाठी तुम्हाला पार्किंगमध्ये वेळ घालवण्याची गरज पडणार नाही. 

महापालिकेकडून पुढील आठवड्यामध्ये यासाठी टेंडर काढणार आहे. त्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनीला पार्किंगच्या गरजांनुसार मोबाइल अॅप विकसित करण्यास सांगितले जाईल. विकसित देशांप्रमाणे सुरुवातीला ही सुविधा १२ भागांमध्ये आणि त्यानंतर इतर भागांमध्ये दिली जाईल. योगायोगाने निती आयोगानेदेखील गुरुवारी ‘बदलाव के चँपियन’ हा तरुण उद्योजकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये पंतप्रधान जोर देत म्हणाले, ‘एक मोबाइल अॅप व्यवस्थेतील प्रत्येत त्रुटी दूर करू शकतो.’ सार्वजनिक सेवा देणाऱ्या काही कंपन्यांनी तर अॅपला गांभीर्याने घेतले आहे. ते आता हळूहळू कर्मचाऱ्यांची जागा अॅपला देत आहेत. अशी कल्पना करा की, तुम्ही एखाद्या काउंटरवरून एखादी सेवा देत आहात, दररोज गर्दी वाढत आहे आणि यासोबत तुमचा गल्लादेखील वाढत चालला आहे. अशा वाढत्या बिझनेसबाबत एखाद्या उद्योजकाची तातडीची पारंपरिक प्रतिक्रिया अशी असेल, वाढत्या गर्दीसाठी आणखी काउंटर उघडले जातील, कर्मचारी वाढवूया.’ मात्र, ‘आपल्या मोबाइलवर ‘अॅप’ डाउनलोड करून ‘क्युआर’ कोडच्या माध्यमातून घरबसल्या बिल भरू शकता’, हीच बदलत्या काळातील आधुनिक विचार प्रक्रिया आहे. 

मी नुकताच बार्सिलोनाला गेलो होतो. तिथे गेल्या आठवड्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात १४ लोक ठार झाले होते. तिथे मी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रेल्वे काउंटरवरून तिकिट खरेदी करताना क्वचितच पाहिले असेल. माझ्यासारखे पर्यटकच तेथून तिकिट खरेदी करतात. काउंटरवर बसलेल्या व्यक्तीसाठी पर्यटकांचे स्वागत करणे आणि त्यांना आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी वेळच वेळ होता. तुम्ही जर भारतातील काउंटरवरील अशा लोकांकडे पाहिले तर त्यांच्याकडे पैसे घेणे प्रवाशांना तिकिट देण्याशिवाय डोके वर काढण्यासाठीही फुरसत नसते. खरे म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या समस्येमुळे आपण इतर देशांच्या तुलनेत अधिक वेगाने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आपण कमी पडतो. 
 
- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...