आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : सामाजिक उतरंडीच्या तळाशी व्यवसायसंधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमची मोलकरीण किंवा वाहनचालक तुम्हाला कर्जाची मागणी करत त्याचे हफ्ते वेतनातून कपात करा, असे म्हणत असेल तर तुम्ही काय विचार कराल? बहुतांश लोक संभ्रमात पडतील. एक म्हणजे त्याला कामावरून काढू नये आणि दुसरे, या बिचाऱ्यांना कोणती बँक कर्ज देईल, असा विचार करत त्याची मदत करावी वाटेल. पण ही व्यक्ती आपले काम किती चोख करते, तिच्यासंबंधीचा निर्णय अवलंबून असेल. मग घरोघरी साड्या विकणारे किंवा स्वयंरोजगार करणाऱ्या त्या लोकांचे काय होत असेल? ज्यांच्यामध्ये स्वाभिमान तर खूप आहे, पण कोणतीच बँक त्यांना पैसे देणार नाही. मायक्रो स्मॉल मीडियम (एमएसएमई) श्रेणीतील व्यवसाय करणाऱ्यांना कठिण परिस्थितीशी सामना करताना थोडी कॅश हवी असते. पैसा उधार देणारे गरज भागवतात, पण त्यांचा व्याजदर खूप जास्त असतो. 

ही विषमता पाहता ‘फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स’चे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर डी. लक्ष्मीपती यांनी ज्यांना बहुतांश औपचारिक बँकिंग आणि वित्तीय संस्था सेवा देत नाहीत अशा मोठ्या संख्येतील एमएसएमईंना सेवा देण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणेतील पाचही राज्यांमध्ये प्रतिनिधीत्त्व असतानाही लक्ष्मीपतींनी या वर्षी महाराष्ट्र मध्यप्रदेशात जाण्याची योजना आखली आहे. ज्या दोन क्षेत्रांमध्ये लक्ष्मीपतींच्या कंपनीने स्वत:ला सक्षम केले आहे, त्या कामगिरीकडे भरपूर नगदी पैसा असलेल्या वित्तीय संस्था पाहत आहे. एक म्हणजे त्यांची कंपनी एमएसएमईंच्या उधारीची जबाबदारी कशी घेते म्हणजेच उधार दिलेली रक्कम सुरक्षित कसे करता येईल. दुसरे म्हणजे ते उधार घेणाऱ्या लोकांच्या कॅश फ्लोचे आकलन कसे करता येईल. उधार देण्याच्या व्यवसायामध्ये नेहमीच ग्राहकाच्या पसंतीच्या गुणवत्तेचे आकलन करणे, योग्य आकारात उधार देणे आणि यासाठी सातत्याने निधी मिळवत राहण्याचे आव्हान असते. जेव्हा मोठ्या फायनान्स कंपन्यांनी मजबूत आधार असलेल्या ‘फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स’ची कार्यपद्धती समजून घेतली तेव्हा त्यांनी भांडवल देण्यास कधीच नकार दिला नाही. 

२०१४ मध्ये लक्ष्मीपती यांना निधीसाठी १७ कोटी रुपये मिळाले. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये १५ कोटी, जून २०१६ मध्ये ११४ कोटी आणि ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांना व्यवसायासाठी ३३३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणुक करणाऱ्या कंपन्यांमध्ये मॉर्गन स्टेनली प्रायव्हेट इक्विटी एशिया, नॉर्थवेस्ट व्हेंचर पार्टनर्स, मॅट्रिक्स पार्टनर्स आणि सिकोइया कॅपिटल यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे. या निधीतून त्यांनी दक्षिणेकडील राज्यांमध्ये ११० शाखा उघडल्या. त्यात १८ हजारांपेक्षा जास्त ग्राहक जोडले गेले. ही गुंतवणूक ‘फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स’ला २०२० पर्यंत ३००० कोटींची कंपनी बनवेल. कंपनीने बाजारामध्ये ५५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी केवळ १० कोटी सध्याच्या ग्राहकांच्या निवासस्थांसाठी आहेत. लक्ष्मीपती यांचे म्हणणे आहे की, सामाजिक उतरंडीत सर्वात खाली असलेले लोक खास करून एमएसएमई गटात छोटी घरे खरेदी करण्यास इच्छुक आहेत. तसेच यामध्ये कंपनीला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये भूमिका बजावण्याच्या संधी वाढतील आणि त्यांचा बिझनेसही वाढेल. 

- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...