आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: ध्येय असेल तर वयाला महत्त्व राहत नाही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली कथा : ते गर्विष्ठ शतायुषी आहेत. म्हणजेच ते १०० वर्षांचे आहेत. ते चालतात, बोलतात आणि आपली दैनंदिन कामे कुणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये १० वर्षाच्या मुलाएवढा जोश आहे. आजही ते शालेय शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. त्यांना लिहिणे, वाचणे शिकायचे आहे. हा उपक्रम केरळातील वायानद येथे १०० तासांच्या क्लासच्या माध्यामातून पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. 

त्यांचे नाव आहे मलायी. ते कधीही शाळेत गेलेले आदिवासी आहेत. मात्र, जीवनात नवी सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर होत नाही, असे त्यांना वाटते. वायानद येथे साक्षरतेची टक्केवारी फक्त ७२ टक्क्यांच्या आसपास आहे. तथापि, राज्यामध्ये ही सरासरी ९३ टक्के आहे. हा फरक कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. केवळ मलायीच नव्हे तर त्यांच्यासारख्या ९० वर्षांवरील १२ असाक्षर वृद्धांनी या उपक्रमात नोंदणी केली आहे. डोळ्यांनी कमी दिसत असताना इतर आरोग्याच्या समस्या असतानाही ते शिकण्यास तयार आहेत. 

दुसरी कथा : कुंदापुर हे गाव म्हैसूर येथून ३४२ किलोमीटरवर आहे. तीर्थनगर उडपी येथून हे गाव ३२ किमी अंतरावर आहे. केवळ यामुळेच शंकरनारायण्णा यांची अम्मा कँटिन इथे रुपयांत इडली सांभार रुपयांत मोठा कप भरून चहा देत नाही. तसेच या कँटिनचा कोणत्याही राजकीय पक्षाशीदेखील संबंध नाही. तथापि, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अम्मा कँटिन सुरू होण्याच्या अनेक दशकांपूर्वीच ती सुरू झाली होती. कुंदापुर येथे शंकरनारायण बेदराकट्टे कँटिन सरकारी माध्यमिक शाळेच्याजवळ आहे. त्याची स्थापना १९५६ मध्ये झाली होती. तेव्हा आसपासच्या सुमारे आठ गावांमध्ये ही एकमेव शाळा होती आणि काही विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी २०-२५ किमी चालत यावे लागायचे. तेव्हा ही कँटिन या मुलांना सवलतीच्या दरात न्याहरी आणि जेवण देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून माधवा किनी उर्फ किणी भट्ट आणि त्यांची पत्नी सुलोचना ही कँटिन चालवत आहेत. आज या जोडप्याचे वय अनुक्रमे ९४ आणि ८१ वर्षे आहे. तथापि, त्या काळी त्यांना ही जमीन सवलतीच्या दरामध्ये मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देण्यात आली होती. त्यामुळेच आज ६० वर्षानंतरही त्यांनी उपकाराची जाणीव ठेवत सवलत कायम ठेवली आहे. ते आजही कमीत कमी किंमत ठेवण्याचा प्रयत्न करतात. नियमितपणे इथे येणारे गुणवत्तेवर पूर्ण विश्वास ठेवतात. कारण गेल्या ६० वर्षांपासून ते आजही तांब्याच्या भांड्यात चुलीवर पदार्थ बनवतात. 

स्थानिक लोक येथून जेवण विकत घेत गरीबांनाही देतात. यामुळेच त्यांना ही कँटिन बंद करण्याची परवानही नाही. तथापि, वय आणि आरोग्याच्या समस्यांमुळे आज ते दररोज २०० पेक्षा जास्त इडली बनवू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वीपर्यंत ते ३० रुपयात पूर्ण जेवण देत होते, परंतु किणी आजारी पडल्यानंतर त्यांनी हे बंद केले आहे, पण न्याहरी देणे सुरू आहे. सुलोचना अाजही पहाटे चार वाजता उठतात आणि उपाशी लोकांसाठी नाश्ता तयार करतात. १९५६ पासून त्यांनी ही सवय कायम ठेवली आहे. 

फंडा असा आहे की : वयआपले काम करत असते, पण तुमच्याकडे जीवनाचे एखादे ध्येय असेल तर खचितच वयाला महत्त्व राहत नाही. 
 
- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...