आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: तुमचे काम मोठे असेल तर तुमचा पत्ता छोटा होतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जी मुले सरकारी शाळांमध्ये शिकतात ती साधारण: गरीब कुटुंबातली असतात. त्यांच्या घरी शालेय शिक्षणाच्या पुस्तकांशिवाय दुसरी पुस्तके शक्यतो नसतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एखादी लायब्ररीच त्यांच्या ज्ञानाचे दरवाजे उघडणारे केंद्र ठरू शकते. दिल्लीच्या दौऱ्यात मी नुकताच प्रथम नावाच्या एका एनजीआेच्या स्वयंसेवकाला भेटलो. हा एनजीआे दिल्लीतील २०० सरकारी शाळांत लायब्ररी चालवतो. त्यांनी उघडलेल्या प्रत्येक लायब्ररीत २०० ते ३०० पुस्तके आहेत. २००३ मध्ये त्यांनी या लायब्ररींची सुरुवात केली. आज १४ वर्षे निरंतर ही लायब्ररी चालवल्यानंतर त्या लायब्ररी आता स्वयंस्फूर्तीने चालाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना या लायब्ररीचा फायदा होत आहे. पुण्याच्या प्रदीप लोखंडे याचेही असेच काम आहे. तो महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यांमध्ये लायब्ररी चालवतो. प्रदीप रिलेशन्सचा फाउंडर आहे आणि त्याच्या या ग्रंथालयांमुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. 

सातारा जिल्ह्यातील वाई हे प्रदीपचे मूळ गाव आहे. तो कॉमर्स ग्रॅज्युएट असून त्याने मार्केटिंगचा डिप्लोमाही केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन्ससारख्या कंपनीतही त्याने काही दिवस काम केले. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक गावांच्या त्याने आपल्या कामानिमित्त दौरा केला आहे. गावात दौरे करत असताना त्याने आपल्या टीमच्या सहकार्याने या गावांची अनेक बाबींची माहितीही संकलित केली. किराणा दुकाने किती, काय विक्री होतो, गावात टेलिव्हिजन सेट किती आहेत, इंटरनेटची सुविधा आहे का, अशा अनेक प्रकारची माहिती त्याच्याकडे आहे. गावाता काय खरेदी जाऊ शकते आणि गावात कशाची आवश्यकता आहे, याची सगळी माहिती त्याच्याकडे होती. या सगळ्या माहितीवरून गावात नवीन अत्याधुनिक ज्ञानाची आवश्यकता असल्याचे त्याच्या लक्षात आले. काही दिवसांनी त्याने ‘ज्ञान-की इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून गावातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी बनवण्याचे काम सुरू केले. २००१ मध्ये त्याने हा उपक्रम सुरू केला. हायस्कूलमधील एखादा विद्यार्थीच या लायब्ररीचे काम पाहतो. हे काम पाहणाऱ्याला ‘ज्ञान-की मॉनिटर’ म्हटले जाते. त्याचा हा उपक्रम सध्या जगातील सगळ्यात मोठा ग्रामीण रीडिंग इनिशिएटिव्ह ठरला आहे. या उपक्रमाअंतर्गत २००९ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगण, अांध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या २० हजार गावांमध्ये लोकवर्गणीतून सुमारे २८ हजार कॉम्प्युटर जोडण्यात आले. आता उर्वरित गावांसाठी ते नवे कॉम्प्युटर घेतात किंवा एखाद्या आयटी कंपनीकडून वापरलेले जुने कॉम्प्युटर खरेदी करतात. 

ग्रंथालयाचा हा उपक्रम जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आत्तापर्यंत खेडेगावातील सुमारे तीन हजार ६०० हायस्कूलमध्ये लायब्ररी स्थापन करण्यात आली. त्याचा ८.५ लाख मुलांना फायदा झाला. या प्रत्येक लायब्ररीत वेगवेगळ्या विषयांची सुमारे २०० ते २५० पुस्तके आहेत. आत्तापर्यंत सहा लाख २५ हजार पुस्तके या लायब्ररींना देण्यात आली आहेत. या सगळ्या पुस्तकांची किंमत आहे तब्बल एक कोटी ५६ हजार रुपये. या सगळ्या ग्रंथालयाचे मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, फिजिकल ट्रेनिंग, भारतीय संविधान, नाटक, संगीत, सामाजिक एवढेच नाही, तर सेक्स एज्युकेशनची पुस्तकेही या लायब्ररीत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक राज्यातील लायब्ररीत स्थानिक भाषेतील पुस्तके आहेत. लायब्ररी ज्या गावात आहे त्या गावाच्या आसपासच्या २७० खेड्या-पाड्यांना या ग्रंथालयाचा उपयाेग होत आहे. लोखंडे यांना नियमितपणे आयआयएम आणि जगातल्या अनेक नामांकित मॅनेजमेंट काॅलेजमध्ये प्रॅक्टिकल मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात येते. एखाद्या गावात लायब्ररी द्यायची असेल तर दात्याला सहा हजार ७०० रुपयांचा चेक पब्लिकेशन संस्थेच्या नावाने द्यावा लागतो. तो पब्लिशर थेट तेवढ्या किमतीची पुस्तकेच पाठवून देतो. या ५४ वर्षीय व्यक्तीला कसे भेटायचे, असे विचारले असता मला माहिती मिळाली की काही नाही, प्रदीप लोखंडे, पुणे-१३ नावाने एक पोस्टकार्ड पाठवा, त्याची भेट मिळेल. 

फंडा असा आहे की : जेव्हातुमचे एखाद्या सामाजिक कार्यातील योगदान वाढते तेव्हा तुमचा पोस्टल अॅड्रेस लहान होतो. या पोस्टल अॅड्रेसवरूनच तुमचे काम समजते. 
 
- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...