इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोच्या मंगळयान मोहिमेने (MOM) संपूर्ण जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. इस्रोने पाठवलेले यान सुमारे 65 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून 24 सप्टेंबर 2014 रोडी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. जगातील कोणत्याही देशाला पहिल्या प्रयत्नात मंगळावर यान पाठवण्यात यश मिळालेले नव्हते. अमेरिकेचे पहिले 6 प्रयत्न अपयशी ठरले होते.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी स्वतः बेगळुरूच्या मार्स मिशन कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळ मोहिमेच्या यशासाठी शास्त्रज्ञ आणि देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे. बंगळुरूच्या इस्रो सेंटरमध्ये या मोहिमेच्या यशाचे साक्षीदार बनलेले मोदी म्हणाले की, आज MOM (Mars Orbiter Mission) चे मंगळाशी मिलन झाले. मार्स ऑर्बिटर मिशनचा शॉर्ट फॉर्म मॉम आहे, आणि मॉम कधी निराश करत नाही. मिशनचा शॉर्ट फॉर्म जेव्हा मॉम असल्याचे मला समजले तेव्हाच ही मोहीम यशस्वी होणार याचा विश्वास होता, असेही ते यावेळी म्हणाले.
24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत असे दाखल झाले यान
मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल होण्याच्या तीन तासांपूर्वी अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमधून यान गेले. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिकांनी सर्व कमांड 14 आणि 15 सप्टेंबरलाच कम्प्युटरमध्ये अपलोड केल्या होत्या. यासंदर्भातील आणखी प्रक्रिया आणि त्यांची वेळ जाणून घेऊयात...
4:17:32
यानात लावलेला शक्तिशाली कम्युनिकेशन अँटिना सुरू झाला.
6:56:32
स्पेसक्राफ्टमध्ये फॉरवर्ड रोटेशन सुरू.
7:12:19
स्पेसक्राफ्टचा मंगळाच्या छायेत प्रवेश. म्हणजेच मंगळग्रहाचे यान आणि पृथ्वी यांच्यामध्ये आंशिक तत्वावर.
7:14: 32
यानाच उंची नियंत्रित करण्यासाठी थ्रस्टर्स फायर करण्यात आले.
7:17:32
मेन इंजीन सुरू.
7:21:50
मंगळाच्या मध्ये आल्यामुळे स्पेसक्राफ्ट दिसणे बंद. सोबतच सिग्नल मिळणेही बंद.
7:22:32
यानाचे कम्युनिकेशन सिस्टीम पूर्णपणे बंद.
7:30:02
इंजीन सुरू झाल्याचे स्पष्ट. पृथ्वीवर सुमारे 12 मिनटांनंतर मिळाली माहिती.
7:37:01
यान मंगळ ग्रहाच्या छायेबाहेर निघाले.
7:41:46
इंजिन बंद झाले. (सुमारे 249.5 किलो इंधन जळाल्यानंतर)
7:45:10
सर्व प्रक्रिया पूर्ण
7:47:46
यानाशी पुन्हा संपर्क झाला.
सहा महिने परिभ्रमण : भारतीय मंगळयान किमान सहा महिने मंगळाच्या कक्षेत परिभ्रमण करेल. या काळात यानावरील उपकरणे माहिती पाठवत राहतील.
पुढील स्लाइडवर वाचा, कधी झाली मोहिमेची सुरुवात...