आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदी राहण्याचे सूत्र कोणते? जाणून घ्या काही रंजक बाबींमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - प्रसारमाध्यमांमध्ये दर आठवड्यात बरेच काही येते. यातील काही गोष्टी अशा असतात ज्याबाबत आपणास कदाचित काहीच माहीत नसते. अशाच काही रंजक गोष्टींच्या माध्यमातून आनंदी राहण्याचे सूत्र सांगण्यात आले आहे.
माणसाला आनंदाचे उत्कट आकर्षण असते. मात्र, या सुखाचेही एक गणिती सूत्र असते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तत्त्ववेत्त्यांमध्ये अनेक शतकांपासून आनंदाबाबत चर्चा झडत आहे. आनंदाच्या परिपूर्णतेमध्ये आनंद दडला असल्याचे अ‍ॅरिस्टॉटलचे म्हणणे आहे, तर कवी खलील जिब्रानच्या मते दु:खाचा मुखवटा उतरणे म्हणजे आनंद होय.
या सगळ्यांमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी आनंद किंवा आनंदी क्षणाचेही सूत्र असल्याचा दावा केला आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये काही निरीक्षणांच्या आधारे याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
पुढे वाचा - आपण जिंकतो त्या स्थितीत आनंदाची प्रचिती येते