आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha King Shivaji Raje Bhosle Birth Anniversary Special

या राजाचे अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले, झोप देखील घोड्यावर घेत होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र हे गेल्या कित्येक शतकापासूनचे समीकरण बनले आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळात- तत्कालिन परिस्थितीत महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य स्थापन करणे सोपी गोष्ट नव्हती. निजामशाही आणि आदिलशाहीने मराठी रयतेला वेठीस धरलेले होते. शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतातील मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यासाठी त्यांचे उभे आयुष्य लढाया करण्यात गेले असे म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही. इतिहासातील दाखल्यांवरुन सांगता येते की महाराजांचे अर्धे आयुष्य हे युद्धात गेले होते. उद्या (19 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमीत्त 'दिव्य मराठी' सिरीज घेऊन आले आहे. यात शिवाजी महाराजांच्या फारशा उजेडात न आलेल्या पैलूंची माहिती करुन दिली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर नजीक शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 च्या 19 फेब्रुवारी रोजी शिवबांचा जन्म झाला. शिवनेरी ग़डावरील शिवाई देवीला माता जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवण्यात आले. तेव्हा शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले अहमदनगरच्या निजामशाहीत एक सरदार होते. 1636 मध्ये मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने अहमदनगरवर चाल केली आणि हे शहर ताब्यात घेतले. त्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून काम करु लागले. आदिलशहाने शहाजीराजांना पुण्याची जहागिरी दिली. तेव्हा बाळ शिवबाला घेऊन जिजाऊ पुण्याला राहायल्या आल्या.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण होते शिवाजी महाराजांचे पहिले मार्गदर्शक