आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा ‘शेतकवी’; अप्रकाशित राहिली ना.धों.महानोरांच्या घरातली ही \'कविता\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या गावरान साहित्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे, साहित्य अकादमी ते पद्मश्री पुरस्काराचे मानकरी कविवर्य ना.धों महानोर. शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा हा ‘शेतकवी’. सोयगाव तालुक्यातील पळसखेडसारख्या गावातून आलेल्या महानोर यांनी जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत. जिवावर बेतणार्‍या घटनांनी त्यांचे आयुष्य ओतप्रोत भरले आले. अनेक कडू-गोड प्रसंगही त्यांनी अनुभवले आहेत, अशावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या त्या सुलोचनाताई.

‘ह्या शेताने लळा लावला असा असा की सुखदु:खाला परस्परांशी इसरलो आता तर हा जीवच असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ’

कवितेच्या या शब्दाप्रमाणे ना.धों. महानोरांच्या शब्दांनी मराठी रसिकांना लळा लावला आहे. काळ्या मातीवर, शेतीवर, गावावर जिवापाड प्रेम करणार्‍या या कवीने अवघ्या देशाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या कवितावर रसिकांनी जसे प्रेम केले, तसेच किंवा त्याहून जास्त प्रेम त्यांची सहचारिणी, पत्नी सुलोचनाताई यांनी केले. भूतकाळातील आठवणीत रमताना त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाची लकेर उमटते. जणू काही कालच सर्व काही घडले एवढ्या ताज्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.

ना.धो. महानोर सांगतात.. 'जणू बाहुला बाहुलीचे लग्न'
बातम्या आणखी आहेत...