आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६० किलोंनी सुरुवात आता ७००० किलो रोस्टेड कॉफीची विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅट : जन्म - २ एप्रिल १९८२
वडील : डेव्हिड चित्तरंजन
(निवृत्त प्रोफेसर)
आई : जैनी स्टाइनमेट
शिक्षण : मास्टर्स इकॉनॉमिक्स (युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया)

नम्रता : जन्म - १९ ऑक्टोबर १९७७
कुटुंब : वडील- किशोर अस्थाना (कॉर्पोरेटमध्ये सीईओ होते), आई- नीरजा अस्थाना (शिक्षिका), मुलगी-आर्या
शिक्षण: मानसशास्त्रात बीए

दोघे पती-पत्नी चेन्नईत काम करत होते. कियोस्कवर वेगवेगळ्या पद्धतीने ग्राइंड करून कॉफी दिली जात असल्याचे त्यांनी तिथे पाहिले. मात्र, दिल्लीत त्यांना ती मिळाली नाही. रोस्टेड कॉफी दोन ते तीन आठवड्यात खराब होते. अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकेदिवशी नम्रतांनी सकाळी चांगली कॉफी मिळू शकेल काय,अशी विचारणा केली. मॅट यांनी अमेरिकेत कॉफी रोस्टिंग शिकले होते. मॅट तेव्हा म्हणाले, मी तुला रोस्टेड कॉफी देऊ शकतो. त्या दिवशी तर ती मिळाली. मात्र,नंतर यावर काम करण्याचा निर्णय घेतला.नेटवर सर्च केल्यानंतर लक्षात आले की चांगल्या दर्जाचे कॉफी फॉर्म कर्नाटकमध्ये होते. दोघे चिकमंगळूर आणि कुर्गला गेले आणि तिथे अनेक कॉफी उत्पादकांची भेट घेतली. येथील उत्पादक अनेक बड्या कंपन्यांसोबत जोडले असून ते निर्यातदार असल्याचे दिसून आले. त्यांना खूप कमी माल पाहिजे होता. उत्पादक म्हणाले, इथे रोस्टेड कॉफी कोण घेईल, येथे सर्वांना इंस्टंट कॉफी पितात.नम्रता म्हणाल्या, आम्ही सुरुवातीस (म्हणजे २०१२ च्या अखेरीस) ६० किलो बियाणे आणले आता आम्ही ते ७ टन घेत आहोत.

बियाणे घेऊन दिल्लीला आलो. ५० हजार रुपयांत खूप लहान राेस्टर आले. हे रोस्टर एका तासात एक किलो रोस्ट करू शकते. सुरुवातीस आमच्याकडे २० किलोची ऑर्डर होती. मॅट रोस्ट करत होता आणि मी ग्राइंडिंग करून पॅकेजिंग करत होते. लोकांच्या फिडबॅकमुळे आम्हाला उत्साह आला. कॉफी प्रेमींना अमेरिकेहून रोस्टेड कॉफी आणण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आम्ही संपूर्ण देशात ताजी रोस्टेड कॉफी देत आहोत. टाटा आणि ब्रूची रोस्टेड कॉफी येते, मात्र ती जुनी असते. आम्ही रोस्टिंगच्या दोन दिवसांनंतर डिलिव्हरी देतो. त्यामुळेच अनेक दूतावास, ओबेरॉय हॉटेल्स, पार्क हॉटेल्स आणि फ्रान्सची लो प्रा बेकरी आमची क्लाइंट आहे.