आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुटीकसाठी ८ हजारांची गुंतवणूक, आता ६५ शहरांत आऊटलेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठी कामे अचानक होतात. हीच कहाणी सलवार कमीज ब्रँड बिबाची आहे. कंपनीच्या संस्थापक सध्या ७२ वर्षांच्या आहेत. मीना बिंद्रा यांनी कल्पनाही केली नव्हती ८ हजार रुपये गुंतवून सुरू केलेले छोटे बुटीक बघता बघता ५०० कोटींची मोठी कंपनी होईल. त्यांचे पती नौदलात होते. मुलेही मोठी झाली होती. खूप वेळ मिळत होता. डिझायनिंगची प्रचंड ओढ होती. मात्र, प्रोफेशनल प्रशिक्षण नव्हते.

एक दिवस पतीला म्हणाल्या काही तरी करायची इच्छा आहे. डिझायनिंगमध्ये. पैसे हवे आहेत. उत्तर मिळाले पैसे तर नाहीत. सिंडिकेट बँकेत कर्जासाठी अर्ज करतो. बँकेने ८ हजारांचे कर्ज दिले. पाच वा दहा हजारांचे लोन का केले नाही, हे अद्यापही त्यांच्यासाठी रहस्यच आहे. मात्र ८ हजारांचे लोन लकी ठरले. कपड्यांची जाण होती. ब्लॉक प्रिंटिंग आवडत असे. कटिंग, स्टिचिंग व ब्लॉक प्रिंटिंग टेक्निक जाणणार्‍याची गरज होती. एक गुजराती मुलगा मिळाला. तो ब्लॉक प्रिंटिंग खूप सुंदर करत असे. दर दोन वर्षाला पतीची बदली होत असे. मुंबई त्यांच्यासाठी अगदी अनोळखी शहर होते. फारशा ओळखी नव्हत्या. राहता सरकारी फ्लॅट खूप प्रशस्त होता. त्याच्याच एका भागात बुटीक सुरू केले. सगळे कस्टमर मीना आँटी म्हणून ओळखू लागले. त्यामुळे बुटीकचे काही नावच ठेवले नाही. काही ग्राहकांशी चांगली ओळख झाली होती, तितक्यात पतीची बदली झाली. नेहमीच पैशाची चणचण भासत. त्यामुळे आता स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निश्चय केला. मुलांसोबत मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. कमावलेल्या पैशातून छोटेसे घर घेतले.

त्या वेळी फारसे सलवार कमीज ब्रँड नव्हते. शीतलसारखे ब्रँड फार वर्षांनंतर आले. मीनाच्या कलेक्शनला एक ओळख मिळाली. कमी काळातच त्यांची उत्पादने मुंबईत लोकप्रिय झाली. होलसेलच्या मोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या. ऑर्डर बुक आणि बिल बुकची मागणी होऊ लागली. मात्र अद्याप बुटीकला नावच नव्हते. लवकर ऑर्डर बुक हवे होते. नाव ठरवण्यासाठी दहा मिनिटेच मिळाली. पंजाबी असल्या कारणाने बिबा शब्द पसंत केला. पंजाबीत लाडाने मुलींना बिबा म्हणतात. हेच पुढे ब्रँड नेम झाले. हे कलेक्शन शॉपर्स टॉप, पँटालून्स, लाइफस्टाइलमध्ये मिळू लागले. १९९७ मध्ये सिद्धार्थने कंपनी जॉइन केल्याचे मीना सांगतात. रेव्हेन्यूची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती.२००४ मध्ये ऑर्बिट आणि सीआर २ मॉलमध्ये पहिले आऊटलेट सुरू केले. २००७ मध्ये किशोर बियाणी यांच्या फ्यूचर व्हेंचरने ११० कोटी रु. मध्ये १० टक्के शेअर खरेदी केले. त्या वेळी विक्री ३० कोटी रुपये होती. मात्र, २०१३ मध्ये भागीदारी संपल्यावर विक्री ३०० कोटी झाली होती. ब्रायडल कलेक्शनसाठी कंपनीने २०१२ मध्ये डिझायनर मनीष अरोरासोबत टायअप केले. नुकतेच कंपनीने रोहित बलसोबत नवे कलेक्शन लाँच केले.

सुरुवात: १९८८, मुंबईमध्ये
व्यवस्थापकीय संचालक : सिद्धार्थ बिंद्रा (४० वर्षीय, बिंद्रांचे छोटे पुत्र)
मुख्यालय : छत्तरपूर, नवी दिल्ली. एक हजार कर्मचारी.
आऊटलेट्स : ६५ शहरांत, १५० एक्सक्लुझिव्ह आऊटलेट, २२५ मल्टिब्रँड पॉइंट