आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुकेरबर्ग, डॅनियल यांचे अकाउंट कोणी केले हॅक?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आणखी एक हायप्रोफाइल ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. या वेळी डिजिटल म्युझिक कंपनी स्पॉटीफायचे सह संस्थापक आणि सीईआे डॅनियल इक यांचे अकाउंट हॅक झाले. हॅकर्सने त्यांच्या अकाउंटवरून ट्विट केले - ‘हे, वुई आर अवरमाइन अँड टेस्टिंग योर सिक्युरिटी’. नंतर अवरमाइनने आपल्या संकेतस्थळावर लिहिले - ‘आज आम्ही डॅनियल इकच्या अकाउंटमध्ये घुसखोरी केली. सुरक्षेची पडताळणी केली. त्यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले. त्यांच्या अकाउंटची सुरक्षितता खरोखरच फारच तकलादू आहे.’

या महिन्याच्याच ५ तारखेला अवरमाइनने फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. तेव्हा झुकेरबर्गच्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी लिहिले होते- लिंक्डइन डाटाबेसवर तुमचा पासवर्ड dadada आहे. त्यांनी झुकेरबर्गच्या इंस्ट्राग्राम अकाउंटमध्येही घुसखोरी केली होती. या हॅकर गटाने २२ जून रोजी अमेरिकन अभिनेता, गायक चेनिंग टॉटमचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले होते आणि अलीकडेच यू-ट्यूब गेमर प्युडायपाय, ट्विटरचे माजी सीईओ ईव्ह विल्यम्स आणि डिक कोस्टेलोचे सोशल मीडिया अकाउंटही हॅक केले आहे.

अवरमाइन हा तीन लोकांचा गट आहे आणि अलीकडेच या गटाने मिक वेबसाइटला एका मेसेजमध्ये स्वत:ला सेक्युरिटी ग्रूप संबोधले आहे. त्यांनी हॅकिंगचे कारण सांगितले की, फक्त इंटरनेट आणि अकाउंट सिक्युरिटीबाबत लोकांना जागरूक करणे. त्यासाठी ही टीम जेव्हा एखाद्याचे अकाउंट किंवा वेबसाइट हॅक करते तेव्हा एक मेसेज मागे ठेवते की आपली सिक्टुरिटी अपग्रेड करून घ्या. त्याचबरोबर आम्हाला शोधून काढा, असे आव्हानही देते.

ही टीम हाय प्रोफाइल अकाउंट हॅक कशी करते? या प्रकरणात सिक्युरिटीज कम्युनिटीजचे म्हणणे आहे की, अवरामाइनच्या हाती जुना पासवर्ड डाटाबेस लागला आहे. या डाटाबेसमध्ये सेलिब्रिटीजचे पासवर्डही आहेत. सेलिब्रेटीज अजूनही जुनेच पासवर्ड वापरत असतील या आशेने हा ग्रूप तेच जुने पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न करतो. पण अवरमाइनचे म्हणणे आहे की, ते सेलिब्रिटीजचे पासवर्ड हॅक करू शकतात कारण या सेलिब्रिटीजनी आपले पासवर्ड ब्राउजर्समध्ये सेव्ह केले आहेत. याच प्रकारे त्यांनी चॉनिंग टॉटमचे यू-ट्यूब आणि ट्विटर अकाउंट हॅक केल्याचा दावा केला आहे. अवरमाइनचे एक थीम साँगही आहे. जेथे ते हॅक करतात तेथे हे गाणेही पोस्ट करतात.
अवरमाइन टीमची एक स्वत:ची वेबसाइटही आहे. तेथे कोणीही आपली वेबसाइट, पर्सनल अकाउंट आणि कॉर्पोरेशनचे सेक्टुरिटी स्कॅन करू शकतो. पण हे हॅकर कुठल आहेत याचा पत्ता लावला एका दुसऱ्या हॅकरने.

त्याने आयपी अॅड्रेसच्या आधारे दावा केला आहे की, अवरमाइन हा सौदी अरेबियाचा गट आहे. अर्थात त्याबाबत निश्चित सांगता येत नाही कारण अवरमाइन आपले इंटरनेट ट्रॅफिक व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) सिस्टीमद्वारे चालवतात. व्हीपीएनमध्ये यूजरला इनिशिअल आयपी अॅड्रेस व्हीपीएन प्रोव्हायडरच्या आयपीद्वारे रिप्लेस केले जाते. अर्थात आपला सौदी अरेबियाशी काहीही संबंध नाही, असे अवरमाइनने स्वत:च स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...