आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चू, आत्मा असेल तर तुझ्याशी कम्युनिकेट करीन !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा आंबेठाणला रात्री १ वाजता जोशी काका अन् मी असंच बाहेर फिरत होतो. बोलण्याचा विषय होता मृत्यू, आत्मा वगैरे. काका बोलता बोलता थांबले. एकदम म्हणाले, बच्चू मी तुला प्रॉमिस करतो, मृत्यूनंतर आत्मा वगैरे काही असेल तर मी नक्की तुझ्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करीन... आज सकाळी ते गेल्याची बातमी आल्यापासून मी वाट बघतेय की काहीतरी करून काका माझ्याशी संपर्क साधतील... बच्चू वाट बघतेय काका...

१९९८ साल असावं. अमरावतीत संघटनेची बैठक होती. शरद जोशी स्वत: बैठकीला येणार होते. माझा भाऊ आल्हाद म्हणाला, तू जा आणि भेट त्यांना. खूप मोठा माणूस आहे. अशा माणसांना नुसतं बघूनही खूप शिकायला मिळतं. मी गेले भेटायला अन् तेव्हापासून त्यांची आवडती बच्चू झाले ती कायमचीच... पुढे कितीतरी वेळा काकांसोबत गप्पांचा योग आला. मला ते त्यांची नात मानत. कैक वेळा ते आमच्या अमरावतीच्या घरी येऊन गेले. प्रचंड विद्वान माणूस. संस्कृत, फ्रेंच, इंग्रजी, मराठी भाषांवर प्रभुत्व, अर्थशास्त्र, संख्याशास्त्राचा गाढा अभ्यास... आम्ही असंख्य विषयांवर बोलत असू. विवाहसंस्था ते राज्यसंस्थेची आवश्यकता असा कोणताही विषय वर्ज्य नसे. मृत्यू हा त्यांच्या नेहमीच चिंतनाचा विषय राहिला. शेवटच्या काळात ते शंकराचार्य, ज्ञानेश्वरी असं सर्व काही मृत्यूनंतरचं जग या शोधाच्या अंगाने वाचत होते. जुलै महिन्यात त्यांनी मला फोन करून सॅम हॅरिसचं "वेकिंग अप अ गाइड टू स्पिरिच्युअॅलिटी विदाऊट रिलिजन' हे पुस्तक मागवलं होतं. मी गेले तेव्हा मृत्यूवर पुन्हा चर्चा झाली. काका म्हणाले, आता मी पुनर्जन्म आहे या निष्कर्षावर आलो आहे.

- वसुंधरा काशीकर, शरद जोशी यांची मानलेली नात
बातम्या आणखी आहेत...