आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Memory Of 2013 : Natural Calamities And Terrorist Attack In World

लेखाजोखा 2013 चा: नैसर्गिक संकट आणि दहशतीने जगाला हादरवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. अमेरिकेपासून फिलिपाइन्सपर्यंत नैसर्गिक संकट ओढवले. दुसरीकडे जगात जिथे निर्सग शांत होता, तिथे माणसे एकमेकांच्या जिवावर उठले. केनियामध्ये अल-शबाबने वर्षातील पहिले सर्वात भयंकर दहशतवादी कृत्य केले. सिरिया आणि गाझा पट्टीतील हिंसाचार यावर्षीही प्रकाशझोतात होता. 2013 मध्ये या दोन ठिकाणी 25 हजार लोकांचा मृत्यू झाला.
उत्तराखंड- महासंकट
गावेच्या गावे वाहून गेली, लष्कराने लाखो प्राण वाचवले
16-17 जूनच्या रात्री उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. पूर आला. डोंगर वाहून गेले. अलकनंदा आणि भागीरथी नदीच्या पात्रात जे काही आले ते वाहून गेले. राहिला तो केवळ उद्ध्वस्त उत्तराखंड. बद्रीनाथ-केदारनाथच्या भागात लाखो स्थानिक रहिवासी आणि यात्रेकरूंना याचा तडाखा बसला. हजारो प्राण गेले. ढिगा-यात दबलेल्या अनेकांचा ठावठिकाणा लागला नाही. देशातील सर्वात मोठे बचावकार्य हाती घेण्यात आले. लष्कराने एक लाख दहा हजारांहून जास्त लोकांना वाचवले.
12 लाख कोटींचे नुकसान
2013 मध्ये नैसर्गिक संकटामुळे 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. केवळ उत्तराखंडमध्ये 20 हजार कोटींंपेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज आहे.
पुढे वाचा केनियातील 26/ 11 च्या हल्ल्याविषयी .......