आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलियन्सचे लक्ष आकर्षण्यासाठी अनेकदा संदेश पाठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे अब्जाधीश युरी मिल्नेर यांनी अंतराळातील जैविक संशोधनासाठी ६५० कोटी रुपये खर्च असलेल्या अभियानाची घोषणा केल्यामुळे लोकांची एलियनप्रती उत्कंठा पुन्हा जागवली आहे. मिल्नेर यांनी मागच्या महिन्यात अभियानाची घोषणा करत म्हटले होते की, ब्रह्मांडातील बुद्धिमान प्राण्याच्या शोधासाठी सिलिकॉन व्हॅलीसारखा दृष्टिकोन जागवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. दुसऱ्या ग्रहांना संदेश पाठवण्यासाठी ६ कोटी रुपये बक्षिसाची स्पर्धाही मिल्नेर यांनी सुरू केली आहे. वास्तविक, अंतराळातील अज्ञात सजीवांना मानवांकडून आधीही अनेकदा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जाणून घेऊया अशाच काही प्रयत्नांविषयी....
अरेसिबो मेसेज
पृथ्वीपासून सुमारे २५ हजार प्रकाशवर्षे दूर एम-१३ या ताऱ्यांच्या समूहाला अंतराळवीरांच्या समूहाने १६ नाेव्हेंबर १९७४ रोजी कोडेड मेसेज पाठवला होता. यात मानवाचे ग्राफिक चित्र, मनुष्याची सरासरी लांबी, पृथ्वीवरील लोकसंख्या आणि अन्य माहितीचा समावेश होता.
गोल्डन रेकॉर्ड
१९७७ मध्ये केप केनव्हेरल येथून सोडण्यात आलेल्या व्हॉयेझर १ आणि २ अंतराळ यानासोबत तांब्याची गोल्ड प्लेटेड डिस्क पाठवण्यात आली होती. डिस्कमध्ये पृथ्वीवरील सजीवांचा तपशील देणारे ध्वनी आणि छायाचित्र होते. यात ५५ भाषांतील शुभेच्छा, संगीत आणि चीनच्या भिंतीचे चित्रही सामील होते.

एक लाख संदेश
११ मार्च २००५ रोजी डीप स्पेस कम्युनिकेशन नेटवर्कने अंतराळात एक लाख क्रेगलिस्ट पोस्टिंग केल्या होत्या. हे संदेश १ ते ३ प्रकाशवर्षे अंतरावरील ठिकाणासाठी होते.

बीटल्सची गाणी
४ फेब्रुवारी २००८ रोजी अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेने ४३१ प्रकाशवर्षे अंतरावरील पोलारिस स्टारच्या दिशेने बीटल्सची गाणी पाठवली होती.

ट्विटर मेसेज आणि व्हिडिओ
१५ ऑगस्ट २०१२ रोजी नॅशनल जिओग्राफिकने अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीसोबत दहा हजार ट्विटर संदेश आणि व्हिडिओ अंतराळात पाठवले होते. ४१ से १५० प्रकाशवर्षे अंतरावरील ताऱ्यांसाठीचे हे संदेश प्रसिद्ध वाऊ सिग्नलच्या उत्तरात होते. १९७७ मध्ये अमेरिकेच्या ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या बिग इयर ऑब्झर्व्हेटरीने हे सिग्नल रेकॉर्ड केले होते. हा सिग्नल अन्य ग्रहांवरील बुद्धिमान प्राण्याकडून आला असल्याचा अनेक लोकांचा विश्वास होता.
बातम्या आणखी आहेत...