दाक्षिणात्य कुटुंबात गेलात तर केळीच्या पानावर भोजन करण्याची संधी मिळतेच. तुम्ही फिरायला दक्षिण भारतात गेलात तरीही केळीच्या पानावर जेवणाची वेळ येतेच. अशा वेळी भोजन कसे ग्रहण करायचे हा मोठा प्रश्न समोर येऊन ठाकतो. मग समोरच्या लोकांचे अनुकरण करीत आपण भोजनाचा आनंद लुटतो. तेव्हा बऱ्याच वेळी फसगतही होते. आपलेच हसू आवरता येत नाही.
कॉमेडी ग्रुप Put Chutney ने याबाबत एक व्हिडिओ जाहीर केला आहे. त्यातून तुम्हाला जेवणाच्या टीप्स मिळतील. त्यात विशेष करुन सांगितले आहे, की जर तुम्हाला जेवण आवडले असेल तर केळीचे पान तुमच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने दुमडा.