आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझ्यासाठी मिस अर्थ ऑलिम्पिकप्रमाणे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
०शोभिता धुलिपाला : मॉडेल
> जन्म : 31 मे 1992 (21 वर्षे)
> जन्मठिकाण : तेनाली, आंध्र प्रदेश (तेलुगू ब्राह्मण कुटुंब)
> कुटुंब : वडील मरीन इंजिनिअर, एक बहीण
> शिक्षण : एच आल कॉलेजमधून कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सची पदवी. सध्या सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस अँड कॉर्पोरेट लॉ करत आहे.
> छंद : पर्यटन, फॅशन, शास्त्रीय नृत्य, गायन व पोहणे
आज (7 डिसेंबर) फिलिपाइन्समध्ये मिस अर्थ-2013 सौंदर्य स्पर्धा रंगणार आहे. यात 90 देशांच्या स्पर्धक सहभागी होणार आहेत. यात धुलिपाला भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती मार्चमध्ये मिस इंडिया अर्थ - 2013 बनली होती.
वर्गात बॅक बेंचर बनण्यासाठी आवश्यक असणारी मस्ती करण्यात शोभिताला मुळीच रस नव्हता. त्याचप्रमाणे इतके मित्रही नव्हते की तिला मिडल बेंचर बनता येईल. त्यामुळे ती वर्गात पुढे बसायची आणि सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करायची. अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळेच तिने चांगल्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिच्या कुटुंबानेही ती मान्य केली. वडील मरीन इंजिनिअर असल्यामुळे बाहेरगावीच असायचे. त्यामुळे जेव्हा शोभिताने शिक्षणासाठी बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिची आई आणि बहीणही हैदराबादला स्थलांतरित झाल्या. पारंपरिक पार्श्वभूमीमुळे लहानपणापासून एक संकुचित भावना होती. त्यामुळे मन मोकळे करण्यासाठी म्हणून शास्त्रीय नृत्याची मदत घेतली. भरतनाट्यम व कुचिपुडीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही दुणावला.
स्टेजवर नृत्याचे सादरीकरण करताना जेव्हा हजारो डोळे तिच्याकडे लागलेले असायचे तेव्हा नृत्यामुळेच आपल्या भावना आणि मेंदूवर नियंत्रण ठेवण्यात तिला मदत व्हायची, असे शोभिताची आई सांगते. सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याचा विचारही तिने कधी केला नव्हता.
तिला लॉचे शिक्षण घ्यायचे होते आणि ते सुरूही होते. कुटुंबातीलही कोणीच ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये नव्हते. हैदराबादमध्ये तिने एका सौंदर्य स्पर्धेचे होर्डिंग पाहिले. घरी बोलून फॉर्म भरला, सहभागी झाली आणि विजयही मिळवला. तेव्हापासून जीवनात परिवर्तन येत गेले. शोभिताने कधीही आईची गळाभेट घेऊन प्रेम व्यक्त केले नव्हते. पण मिस इंडिया अर्थ - 2013 चा किताब जिंकल्यानंतर मात्र ती स्टेजवरून उतरून थेट आईकडे गेली आणि तिच्या गळ्यात पडून भरपूर रडली. ते पाहून तिची आईही रडू लागली. तो दोघींच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस होता. या विजयामुळे आत्मविश्वासाची कमतरता दूर करण्यात तिला यश आले होते.
तेव्हापासून आतापर्यंत शोभिता मिस अर्थच्या किताबासाठी सराव करत होती. फायनल शोमध्ये ती फाल्गुनी आणि शेन पिकॉकचा डिझायनर गाऊन वापरणार आहे.
तर टॅलेंट राउंडमध्ये शामक दावर यांनी शिकवलेला डान्स करणार
आहे. ती मिस फोटोजनिक, मिस टॅलेंटेड आणि नॅशनल कॉस्च्युम राउंडमध्येही सहभागी होईल. त्याचे आऊटफिट स्वप्निल शिंदे यांनी डिझाइन केले आहेत.
स्पर्धेच्या तयारीमुळे मला ऑलिम्पिकची तयारी सुरू आहे, असे वाटत असल्याचे शोभिता सांगते. गेल्या वर्षी याच वेळी लॉचा अभ्यास करत होते. तर आज एका जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे स्वप्ने कधीही भंग होऊ देऊ नका, असा संदेश ती देते.
क्राऊन
० 24 मार्चला पाँड्स फेमिना मिस इंडिया 2013 मध्ये ती फर्स्ट रनरअप. पाँड्स फेमिना मिस इंडिया बंगळुरू 2013 ची विजेती.
०फेमिना मिस इंडियामध्ये ‘मिस स्टायलिश हेअर’, ‘मिस अ‍ॅडव्हेंचर’ आणि ‘मिस फॅशन आयकॉन’ हे किताब मिळवले.