आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day SPL: ग्लॅमरस राजकारणी, वादग्रस्त वक्तव्ये ते सुशीलकुमार शिंदेंच्या राजकीय वारसदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे महाराष्ट्रातील एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य येथून त्या निवडून आल्या. परंतु, त्यानंतर 'एमआयएम' या पक्षाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रचंड वाद झाला होता. काल (मंगळवार) प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस होता.
प्रणिती शिंदे यांनी 2001 मध्ये मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमधून कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर 2004 मध्ये मुंबई विद्यापिठाच्या गर्व्हनमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी केले. प्रणिती यांना दोन बहिणी आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय वारसदार म्हणून प्रणिती यांच्याकडे बघितले जाते.
प्रणिती शिंदे यांनी 'जाई जुई विचार मंच' या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भरीव काम केले आहे. कला आणि संस्कृती, बालके, पायाभुत सुविधा, दलितांचा विकास, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कामगार आणि रोजगार, अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या सोलापूर मध्य मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत अल्प मतांनी विजयी झाल्याने त्यांनी याचे खापर आयआयएम या पक्षावर फोडले होते. हा पक्ष राष्ट्रविरोधी असून त्याच्यावर आणि त्याच्या नेत्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर यावर बराच वाद झाला होता. आयआयएम पक्षाने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याची नोटीस बजावली होती.
पुढील स्लाईडवर बघा, ग्लॅमरस राजकारणी प्रणिती शिंदे यांचे काही फोटो....