एका नव्या अभ्यासानुसार जगात वेगाने पसरणार्या डेंग्यूचा प्रसार आणि कालावधीबाबत मोबाइलच्या रेकॉर्ड््सचा वापर केला जातो आहे. हार्वर्ड टीएच स्कूल आॅफ पब्लिक हेल्थच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी मोबाइल फोन रेकॉर्डच्या एका मोठ्या डाटा सेटचा वापर करून एक नवे माॅडेल विकसित केले आहे. याद्वारे आजारासंबंधी आधीच माहिती घेता येणार आहे. त्यामुळे या आजाराबद्दल धोक्याचा इशाराही देता येईल. यासाठी संशोधकांनी २०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले जाते.
खूप ताप, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे
डेंग्यू डासांपासून जगभरात वेगाने पसरणारा आजार आहे. डेंग्यू झालेल्या व्यक्तीस त्वरित ताप चढतो. त्याचबरोबर रक्त वाहणे, बेशुद्ध पडणे हीसुद्धा डेंग्यूची लक्षणे आहेत. कधी कधी या आजारामुळे रुग्णाचा मृत्यूही ओढवतो.
अशा प्रकारे निष्कर्ष : निष्कर्षावरून माहिती मिळाली की, कोणत्याही देशात कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून येणार्या आणि जाणार्या पॅटर्नचा वापर करून याच्या भौगोलिक प्रसाराचे अंदाज आणि एखाद्या जागी होणारा याचा फैलाव व आजार वाढण्याचा कालावधी माहिती करून घेण्यासाठी केला जातो. संशोधकांनी सांगितले, हवापाण्याच्या बदलावर आधारित विकसित करण्यात आलेले ट्रान्समिशन मॉडेल आणि फोन कॉल रेकॉर्डद्वारे येणार्या व जाणार्या कॉलच्या आकड्यांवरून याची तुलना करण्यात आली.
प्रवासामुळेही वाढतो डेंग्यू : जगभरातील बहुतांश लोकांना या प्राणघातक रोगाने विळख्यात घेतलेले आहे. हवा व पाण्यात होणार्या बदलामुळेच डेंग्यू पसरवणार्या डासांची संख्या वेगाने वाढते आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णांनी दुसर्या देशात प्रवास केल्यास आजाराचाही प्रसार होतो. या आजारांची तत्काळ माहिती उपलब्ध होत असल्याने तो रोखण्यास खूप मदतच होते, असे संशोधकांनी सांगितले.