आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Application For Happy Mood, Diyva Marathi

खराब मूड चांगला करण्यासाठी हे आहेत काही अ‍ॅप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंदुरुस्ती, आरोग्य किंवा आनंदी राहण्याच्या क्लृप्त्या स्मार्टफोनमधून सहजगत्या उपलब्ध होतात. चला तर मग जाणून घेऊ अशाच काही अ‍ॅप्सविषयी. ते डाऊनलोड केल्यामुळे आपल्या जीवनात आनंदी आनंद पसरेल.

हॅपी हॅबिट्स (एचएच)
एचएच अ‍ॅप्समध्ये कोग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपीवर (सीबीटी) काम केले जाते. आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी यात काही उपक्रम आहेत. ते रोज केल्याने आनंदी राहण्यास मदत होते. या अ‍ॅप्सला हॅपिनेस जनरल असे म्हणतात.

मोमेंट्स
जुन्या, चांगल्या आठवणींना उजाळा दिला की आनंद परतून येतो. हेही सत्य आहे की नेहमी आनंदी राहणारे लोक अनेक वर्षे सुखी आयुष्य जगतात. चांगल्या घटना आठवून आनंदी राहण्यासाठीच या अ‍ॅप्सची निर्मिती करण्यात आली आहे. यात छायाचित्रे, आवाज आणि मजकूरही सेव्ह करता येतो.

सिक्रेट्स ऑफ हॅपिनेस
लेखक जॉन मिल्टन अंध होता. तो म्हणायचा की डोळ्याला दिसत नाही म्हणून उदास राहण्याची गरज नाही. या अ‍ॅप्समध्ये आपल्याला आनंदी राहण्याच्या काही नव्या गोष्टी समजतील. धकाधकीच्या जीवनात आनंदी कसे राहायचे याच्या काही टिप्स मिळतात. यश, आरोग्य आणि मधुर नातेसंबंध ठेवण्यासाठीही मदत मिळू शकते.

डेली हॅपिनेस
या अ‍ॅपमध्ये आपल्याला दररोज आनंदी राहण्यासाठी चांगल्या आणि प्रेरणादायी गोष्टी मिळतील.

हॅपी हेल्दी अ‍ॅप
मूड चांगला करण्याच्या बारीकसारीक गोष्टी या अ‍ॅपमधून आपल्याला मिळू शकतात. जे युजर्स नेहमीच तणावात राहतात त्यांना या आयफोन अ‍ॅप्समुळे मोठा फायदा मिळू शकतो. या अ‍ॅप्सचा एक चांगला संदेश आहे तो असा - आपले आनंदी असणे कोणावरही अवलंबून नसते. तो स्वत:तूनच मिळत असतो.

गेट हॅपिनेस : हिप्नोसिस
या ऑडिओ फाइल्समध्ये हॅपिनेस अ‍ॅडव्हायझर आहे. जे युजरला आनंदी ठेवण्याचा कानमंत्र देते. यात एक हॅपिनेस स्वीच आहे. मूड खराब झाला की तो दाबा. गोष्टी कानी पडतील.

लिव्ह हॅपी
वेगवेगळ्या घटनांमध्ये आनंदाची पातळी काय असते ते या अँड्रॉइड अ‍ॅपमुळे माहिती पडेल. यात युजरला पॉझिटिव्ह नोट्सची प्रोफाइल बनवता येते.