आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेल गिसेल बंडचेन- वय ३६, १४ वर्षांपासून मॉडेलिंगमध्ये अढळ स्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म- २०जुलै १९८०
आई-वानिया(बँकलिपिक), वडील-व्लादिर(प्रोफेसर)पाच बहिणी
कुटुंब- पतीटॉम ब्रेडी (फुटबॉल खेळाडू, दोन अपत्ये)
चर्चेतका - जगातीलसर्वात महागडी आणि अव्वलस्थानी असलेली मॉडेल, वार्षिक कमाई २०४ कोटी रु.
वय ३६, १४ वर्षांपासून मॉडेलिंगमध्ये अढळ स्थान
गिसेल वर्ष २००२ पासून जगातील सर्वाधिक कमाई असलेली मॉडेल आहे. दोन मुलांची आई आहे. गिसेल १४ वर्षांची असताना शाळेच्या वतीने पोर्टो अलेग्रेच्या सहलीसाठी गेली होती. तेथे मॉडेलिंग स्काउटच्या स्पर्धेत तिची निवड झाली. आईच्या सल्ल्याने तिने मॉडेलिंगचा कोर्स केला.

आई वेनियासोबत तिने एका जाहिरातीसाठी कामही केले.ही जाहिरात तिने मदर्स डे निमित्त केली होती. तिचे वडीलही एका जाहिरातीत तिच्यासोबत झळकले होते. आई-वडील,५ बहिणी तिला लाडाने ‘ऑलिव्ह ऑइल’ म्हणून बोलावतात. घराची सफाई स्वत: करते. आपल्याला संसर्गाचे भय वाटते म्हणून मीच सफाई करते असे ती सांगते. संयुक्त राष्ट्रांनी तिला पर्यावरण अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर केले.

किशोरवयातच न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये भाग घेऊ लागली. १९९९ पर्यंत ती अमेरिकेतील सर्वात व्यग्र मॉडेल झाली होती. १९९९ मध्ये वोग मॅक्झिनने तिला वेळा मुखपृष्ठावर स्थान दिले. २००० मध्ये तिच्या करिअरची भरभराट झाली. व्हिक्टोरिया सिक्रेट या अंतर्वस्त्रांच्या ब्रँडने तिला २५० लाख डॉलर्समध्ये करारबद्ध केले. या ब्रँडचा ती चेहराच झाली. २००४ मध्ये तिने हॉलीवूड चित्रपट ‘टॅक्सी’,२००६ मध्ये ‘द डेव्हिल्स विअर प्राडा’ यात अभिनय केला.

२००६ मध्ये तिचा परिचय फुटबॉल खेडाळू टॉम ब्रेडीशी झाला. ते विवाहबद्ध झाले त्यांची दोन अपत्ये आहेत. २००७ मध्ये व्हिक्टोरिया सिक्रेट सोडत असल्याचे गिसेलने जाहीर केले. तिचे करिअर लयाला जाणार असे भाकीत केले गेले. मात्र ती फॅशन शो मध्ये दिसत राहिली. अनेक ब्रँडशी करारही केले. सर्वात महागडी मॉडेल हे स्थान अद्यापही अढळच आहे. वार्षिक कमाई २०४ कोटी आहे.
बातम्या आणखी आहेत...