आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाचे मानसशास्त्र : महागड्या वस्तूचा दर्जा सामान्य असला तरी मेंदूला चांगला वाटतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - वस्तूंचा दर्जा माणसाच्या थेट मेंदूशी जोडला जातो. सामान्य दर्जाची एखादी वस्तू महाग असेल तर ती चांगली वाटते. तसेच स्वस्त वस्तूचा दर्जा चांगला असला तरी ती कमी चांगली वाटते. म्हणजे भाव चांगला तर दर्जा चांगला, अशी मेंदूची भावना होते.
 
पैशाचे मानसशास्त्र यामागचे कारण आहे. त्यावर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व स्टॅनफोर्ड  इन्स्टिट्यूटच्या अभ्यासात वरील निष्कर्ष निघाले. मेंदूतील अशा हालचाली समजण्यासाठी आनंदातील खर्च (हॅपी स्पेंडिंग) या शब्दाचा वापर केला आहे. याचा अर्थ लोक केवळ पैसे कमावून नव्हे तर पैसे खर्च करून आनंद प्राप्त करतात.
बातम्या आणखी आहेत...