आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनमध्ये चटपटीत पदार्थांची क्रेझ, खवय्येगिरीला आले उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाऊस पडल्यानंतर भजी खात चहा पिणे या सर्वसाधारण गोष्टी आहेत. मात्र मान्सूनचे चटपटीत पदार्थ आता मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पाहायला मिळत आहेत. मान्सून स्पेशल पदार्थांना नेहमी जोरात मागणी असते. यावर्षी पुरेसा पाऊस नसला तरीही हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या मागण्यांनुसार वेगवेगळे पदार्थ बनवले जात आहेत.

स्पायसी डिशेजची भुरळ
मांसाहारी पदार्थांमध्ये सुप्स, निरनिराळ्या कॉफीज या पदार्थांची ग्राहकांकडून मागणी असते. पाऊस पडल्यानंतर गरम व चटपटीत पदार्थांची मागणी राहते, असे औरंगाबादच्या अतिथी हॉटेलचे व्यवस्थापक दिवाणसिंग चव्हाण यांनी सांगितले. सध्या आम्ही मुलीगेतवानी सूप आणि मिनीस्ट्रोनी सूपची तयारी केली आहे. याबरोबरच मुळा आणि डाळीचे भजी, शोरबा, शेजवान टोस्ट चिकण टिक्का, यांचीदेखील मागणी आहे. या सगळ्या डिशेज स्पायसी असल्याबरोबरच गरमदेखील आहेत.
पालक-मिर्चीची भज्जीची क्रेझ
औरंगाबादच्या सॉल्ट रेस्टॉरंटचे व्यवस्थापक चंद्रकांत धोंडगे यांनी सांगितले की, पावसाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे लोकांना काहीतरी चटपटीत व गरम खावेसे वाटते. त्यामुळे आम्ही सूपबरोबरच पालक-मिर्चीचे भजी, तळलेले गोस्त, तंदुरी चिकण, टंगडी कबाब आदी आमच्या मेन्यूमध्ये सामील केले आहे. मात्र यात सर्वात जास्त पालक-मिर्चीच्या भजींना जास्त मागणी असते. मांसाहारी पदार्थ चटपटीत, तसेच शरीरासाठी लाभदायक असल्यामुळे त्यांना शाकाहारी पदार्थांच्या तुलनेत जास्त मागणी असल्याचे दिसते. शिवाय लेमन टी, ब्लॅक कॉफी यांसारख्या गरम पेयांनाही चांगली मागणी आहे.

मागणी असणारे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ
०मिक्स ग्रिल्ड कबाब
०चिकन स्टिक सिजलर
०सिंगिंग प्रॉन्स
०चिकन बार्बेक
०फिश फ्राय
०कन्जुमाई सुपं
०पनीर स्प्रिंग्लर
०पनीर स्टिक सिजलर
सर्वात आवडते पदार्थ
०चिकन स्टिक सिजलर
०फिश फ्राय
०कन्जुमाई सूप