आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे अढळ स्थान: तू माझ्यावर कधीच का रागवत नाहीस?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहास असो वा साहित्य, आईचा रोल प्रत्येक वेळी मुलासाठी प्रेरणास्रोत आहे. संघर्षातही ती भागीदार असते. मुलाच्या हट्टापायी दान केले सोन्याचे कडे आई आपल्या मुलासाठी जीव देण्याची तयारी ठेवते. एक दिवस त्या बालकाच्या दारात फाटक्या कपड्यांत एक महिला आली. ती म्हणाली, बेटा, काही भीक दे, हे ऐकून तो बालक भावुक झाले आणि म्हणाले, आई, एक गरीब महिला मला बेटा म्हणून काही मागते आहे. आई म्हणाली, पोळी-भात शिल्लक नाही.वाटल्यास तांदूळ दे. तो मुलगा म्हणाला- तांदळाने काय होईल? सोन्याची बांगडी देऊन टाक. मोठा झाल्यावर तुला दोन बांगड्या बनवून देईन. आईने खरोखर सोन्याची बांगडी काढून दिली. मोठा झाल्यावर तो आईला म्हणाला, तुझ्या हाताचे माप दे, मी बांगड्या बनवून देतो. आई म्हणाली, कोलकाताजवळ गरीब मुलांसाठी मोफत विद्यालय आणि चिकित्सालय सुरू कर, अशी शिकवण घेणारा तो मुलगा होता ईश्वरचंद्र विद्यासागर.

मध्यरात्र, बनवीरची तलवार आणि मुलाचे किंचाळणे
पन्ना धाय राणा सांगा यांचे पुत्र राणा उदयसिंह यांची धाय आई होती. पन्ना धायचा मुलगा चंदन आणि उदयसिंह सोबतच मोठे झाले. दासीचा पुत्र बनवीरचे चित्तोडचा राजा बनण्याचे स्वप्न होते. बनवीरने एका रात्री राज परिवारातील अन्य सदस्यांना मारून उदयसिंहची हत्या करण्यासाठी आला. पन्ना धायने उदयसिंहला टोपलीत लपवून बाहेर पाठवून दिले.स्वत:च्या मुलाला झोपवून दिले. बनवीरने चंदनला पन्ना धायसमोर तलवारीने मारले.कर्तव्यासाठी ितने स्वत:चा मुलगा बलिदान केला.

मुलगा जेलमध्ये गेला, आईने सांभाळली क्रांतीची मशाल
रुसी कादंबरीकार मॅक्सिम गोर्की यांची कादंबरी ‘मां’ अन्ना जातोमोवा नामक महिलेपासून प्रेरित होता. कथेत आईचे पात्र पेलागेइया निलोव्ना व्लासोबा यांचे होते. माझा मुलगा पावेलची कम्युनिस्ट विचारधारा अाणि क्रांतिकारी चळवळीवर विश्वास वाढताे. एक दिवस मुलगा पकडला जातो. ह्या विचाराचे पत्र वाटण्यासाठी आई स्वत: स्टेशनपर्यंत पोहाेचते. पोलिसांनी ितला पाहूनही न पळता ती पत्रिका वाटते. पोलिस तिला खूप मारतात. शेवटी आई मजुरांच्या आंदोलनाची मशाल बनते.

पुत्र अल्पायुषी चालेल, पण ज्ञानी असावा
आद्य शंकराचार्य यांचे बालपणीचे नाव होते-शंकर. आठव्या वर्षीच त्यांनी तत्त्वज्ञान मिळवण्यासाठी घर सोडले. हे त्यांची आई विशिष्टादेवी यांच्यासाठी मोठा आघात होता. त्यांनी मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शंकर म्हणाले, जेव्हा नारदांनी घर सोडले तेव्हा ते पाच
वर्षांचे होते. मी तर आठ वर्षांचा आहे. त्यानंतर शंकराचार्यांनी विचारले, जेव्हा माझ्या आईने पुत्र मागितला तेव्हा तिला सांगण्यात आले की, पुत्र अल्पज्ञ असेल तो दीर्घायु असेल आणि सर्वज्ञ असेल तर अल्पजीवी होईल. तेव्हा आईने सर्वज्ञ पुत्र मागितला. आईने माझ्यासाठी दीर्घायू नाहीतर ज्ञान मागितले होते. मला कमी वयात खूप काम करायचे होते. शंकराचार्यांनी आईला वचन दिले की, मरणाच्या दारात असताना मी कुठूनही तुझ्याजवळ येईन.
बातम्या आणखी आहेत...