आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृदिन विशेष: आई, तू आहेस मग मला भीती कशाची?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाई कधी शिक्षक, कधी संरक्षक असते. त्याग, बलिदान अाणि प्रेमासारखे गुण अाईमध्येच असतात. त्याबाबतच्या या कथा...
महान शिक्षक
अाई मला काहीच नकाे,
माझे पैसे मला मिळाले

एक लहान मुलगा अाईला कागद देतो. अाई सर्व काम संपल्यावर ताे वाचते. मुलाने लिहिले हाेते, ‘अाई मी गवत कापले त्याचे १०० रुपये. घरातील खाेली स्वच्छ केली त्याचे १० रुपये. तुझ्याबराेबर बाजारात अालाे त्याचे १० रुपये. कचरा फेकला त्याचे १० रुपये. चांगला निकाल
अाला त्याचे १० रुपये. असे सर्व मिळून तू मला १४० रुपये दे. अाई हसली. ितने पेन उचलला कागद घेतला अाणि लिहिण्यास सुरुवात केली. बेटा तुला नऊ महिने पाेटात ठेवले, माेफत. त्यानंतर दाेन वर्षे तू अाजारी पडला. मी एकाही रात्री झाेपू शकले नाही. तुझा सांभाळ केला, प्रेम
केले, माेफत. तुझे सर्व काम करते तेही माेफत. तू जेव्हा या गाेष्टींची बेरीज करशील तेव्हा तुला समजेल माझ्या प्रेमाची काही किंमत नाही. हेवाचून मुलाच्या डाेळ्यात पाणी अाले. त्याने कागदावर लिहिले, अाई, माझे पैसे मला मिळाले.
रक्षणकर्ती
डोळे पाणावले, अाज माझी जागा अाईने घेतली
एक मुलगा रुग्णालयात बेशुद्ध झालेल्या आपल्या अाईच्या डाेक्यावरून हात फिरवत हाेता. अाई पाणी पिऊ शकत नसल्यामुळे तो कापसात पाणी भरून तिचे अाेठ ओले करत हाेता. जवळच उभा असलेला त्याचा मुलगा हे पाहत हाेता. त्याने म्हातारपण व आजारपणामुळे अाजीचा
केवळ रागच पाहिला हाेता. ताे आपल्या वडिलांना विचारताे, ‘अाजी जेवताना ताेंडातून घास काढत रागवत आहे, तरी तुम्ही म्हणतात, अ ाई भाजी खा, पोळी नरम अाहे. तरी तुम्ही त्यांच्यासाठी उदास का अाहात?’ वडील सांगतात, बेटा लहानपणी मी अाजारी पडल्यावर अाई
मला कडेवर घेऊन पळत हाेती. माझ्या ताेंडातून निघणा-या घासाने नाराज हाेत नव्हती. मला ताप असताना, माझे डाेळे बंद असताना ती मला अंगाई एेकवत असे.’ काही वेळाने मुलाचे वडील त्यांच्या अाईच्या डाेक्यावर हात फिरवत तीच अंगाई गात हाेते, जी त्यांची अाई
त्यांना एेकवत हाेती. त्या वेळी अाईसुद्धा डाेळे उघडत हाेती.
सर्वोच्च बलिदान
बेटा माझा द्वेष करू नकाे,
मी तुझ्यावर खूप प्रेम करते

मी अाईचा द्वेष करत हाेताे. कारण तिला एकच डाेळा हाेता. ितला वारंवार टाेचून बाेलत हाेताे. ती रडायची, पण काहीच बाेलत नव्हती. माेठा झाल्यावर मी माेठ्या शहरात गेलाे. त्या ठिकाणीच माझे लग्नही झाले. एका दिवशी अाई मला भेटायला अाली, पण मी अाेळखत नसल्यासारखाच वागलाे. ती काही न बाेलता निघून गेली. काही दिवसांनी शाळेच्या एका कार्यक्रमानिमित्त मी अापल्या गावी गेलाे. अापल्या घरी गेलाे. अाई फरशीवर झाेपली हाेती. ितच्या हातात पत्र हाेते. त्यात लिहिले हाेते, बेटा माझे जीवन पूर्ण झाले. अाता तुला
भेटायला शहरात येणार नाही. मला तुझी खूप अाठवण येते, परंतु तुला माझी लाज वाटते. तू लहान हाेता, तेव्हा एका अपघातात तुझा डाेळा निकामी झाला हाेता. अाई म्हणून मी तुझा डाेळा निकामी पाहू शकत नव्हते. त्यामुळे माझा एक डाेळा तुला दिला. बेटा माझा द्वेष करू नकाेस.
आईच देवदूत
फक्त इतके समजून घे,
अाईला प्रेषित म्हणतात

एक मुलगा जन्माच्या काही क्षणांपूर्वी ईश्वरास विचारताे, मी इतका लहान अाहे. स्वत: काहीच करू शकत नाही. धरतीवर कसा राहील. ईश्वर म्हणाले, माझ्याजवळ अनेक प्रेषित अाहेत. त्यातील एकाची निवड मी तुझ्यासाठी केली अाहे. ताे तुला खूप प्रेम करेल. मुलगा म्हणताे, ला
ेक माझ्याशी बाेलतील तर मला कसे समजेल. ईश्वर म्हणतात, प्रेषित तुला प्रेमाच्या शब्दांनी शिकवेल. मुलगा म्हणाला, जेव्हा मला तुमच्याशी बाेलायचे असेल तेव्हा? ईश्वर म्हणतात, तुम्हाला ताे प्रार्थना शिकवेल. मुलगा िवचारताे, पृथ्वीवरील वाईट लाेकांपासून माझे संरक्षण काेण करेल? भगवान म्हणतात, प्रेषितच तुला वाचवेल. स्वर्गात शांती हाेती पण पृथ्वीवरून तळपण्याचे अावाज येत हाेते. मुलाने रडत-रडत ईश्वराला विचारले, अाता मी जात अाहे त्या प्रेषिताचे नाव मला सांगा, ईश्वर म्हणाले, प्रेषिताच्या नावाला महत्त्व नाही, पण इतके समजून घे, त्याला "अाई' नावाने बाेलवतात.