आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही महान करायचे असेल तर..आई रोज जे करते तेच करा, मायलेकाच्या नात्याच्या 5 गोष्‍टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्तीसगडची दुर्गा जखमी अवस्थेतही मातृत्वाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या दुर्गा या महिलेचे हे छायाचित्र जगासमोर एक आदर्श बनले. - Divya Marathi
छत्तीसगडची दुर्गा जखमी अवस्थेतही मातृत्वाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या दुर्गा या महिलेचे हे छायाचित्र जगासमोर एक आदर्श बनले.
अपघातात जायबंदी आईने बेशुद्धावस्थेतही भागवली बाळाची भूक
दुर्गा पती अजय आणि दीडवर्षीय मुलगा अखिलेशसोबत दुचाकीवरून भुरका (छत्तीसगड) या गावी जात असताना बिलासपूरच्या तखतपूरजवळील बेलसरी पुलावर एका कारने त्यांना धडक दिली. दुर्गा घटनास्थळीच बेशुद्ध पडली. हा भाग सुनसान होता. ते तिघेही धडकेने दूरवर जाऊन पडले होते. दीड वर्षाचा अखिलेश भुकेने विव्हळत होता. रडत रडत तो कसातरी आईच्या देहाजवळ पोहोचला आणि तिच्या छातीवर डोके ठेवून आपली भूक भागवू लागला. थोड्या वेळाने आसपासचे लोक तिथे जमले. मायेच्या ममतेचे हे रूप पाहून बघ्यांचे डोळे आपोआपच पाणावले होते.जखमी अवस्थेतही आपल्या बाळाची भूक भागवणाऱ्या या मातेचे हे छायाचित्र म्हणजेच ममतेच्या पाझराचे अलौकिक दर्शन... 

भूकंपाने जीव गेला तरीही आई बाळाला दूध पाजतच होती
२१ वर्षीय जेहनाब : भूकंपात सापडूनही जागवली ममता...

२६ जानेवारी २००१ रोजी गुजरातच्या भुजमध्ये ७.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप आला. त्यात हजारो बळी गेले. चार दिवसांनी नूर मोहल्ल्यातील मलब्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. भूकंपाच्या ८१ तासांनंतर कुणी जतवंत राहण्याची सर्वांनी आशाच सोडली होती. मलबा हटवल्यानंतर पाहिले तर, दहा महिन्यांचा मुर्तजा अली तोंडात अंगठा चोखत होता. भूकंपावेळी त्याची आई जेहनाब त्याला दूध पाजत होती. तेव्हाच अंगावर छत कोसळले. यात जेहनाब, वडील मुफतदाल यांच्यासह कुटुंबातील दहा जण ठार झाले होते. मुर्तजा जिवंत असणे हा चमत्कारच असल्याचे डॉक्टरांचे मत होते. उपाशीपोटी सहा अंश तापमानात मुर्तजा जगलाच कसा, हे कुणालाच समजले नाही. लोकांच्या मते, आईच्या कुशीतील ऊबच मुर्तजाची प्राणरक्षक बनली होती. 
 
१० मिनिटे मगरीशी झुंज देत मातेने मुलीला काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर
५८ वर्षीय दिवालीनेन समाेर १३ फुटी मगर आणि संघर्ष...

एप्रिल २०१५ मध्ये वडोदराच्या विश्वामित्री नदीत दिवालीनेन त्यांच्या १९ वर्षीय कांता नामक मुलीसोबत कपडे धुण्यास गेल्या. कपडे धुताना कांताचे पाय मगरीने पकडले. सुरुवातीला दिवालीनेन यांनी कांताला हातानेच ओढण्याचा प्रयत्न केला. पण अपयश आल्याने कपडे धुण्याच्या लाकडानेच तिने मगरीला मारायला सुरुवात केली. तोंडावर सतत प्रहार झाल्याने मगरीचे काहीच चालले नाही. तब्बल दहा मिनिटांच्या या थरारात शेवटी आईच्या संघर्षापुढे मगरीला माघार घ्यावी लागली. कांताच्या पायाला खोल दुखापत झाली. पण प्राण वाचले. दिवालीनेन सांगतात, मगर कांताला पाण्यात घेऊन जाईल असेच मला सुरुवातीला वाटत होते. पण मी पूर्ण ताकद एकवटली. गावकऱ्यांच्या मते या नदीत सुमारे २०० मगरी आहेत.

संशोधन: बुद्धिमत्तेमागेही तुमची आईच
होय, अपत्य किती बुद्धिमान होईल हे वडिलांची नव्हे तर आईची गुणसूत्रे ठरवतात. आपली बुद्धिमत्ता ही आईमुळेच असते. विज्ञानानुसार, ६० टक्के बुद्धिमत्ता आनुवंशिक असते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, आई आणि मुलाच्या संबंधांतील दृढतेमुळेच मेंदूच्या काही खास भागांचा विकास होतो.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा,
> मुलीचे पोट भरण्यासाठी ४३ वर्षीय महिला रोज जगते पुरुषाचे जीवन...
> १४०० मुलांची आई, भेदभाव होऊ नये म्हणून पोटची मुलगी दिली दत्तक...
> मी आई कडून काय शिकले...?
> कशा प्रकारे आई कठीण शब्दांचेही गमतीदार अर्थ शिकवते...  
> आई आणि बारा राशी...
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...