आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी कळू नये म्हणून एक चित्रपट दोन शोमध्ये पाहत मनीष मुंदडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष मुंदडा, सीईओ व चित्रपट निर्माता
वय - सुमारे ४२ वर्षे
शिक्षण - एमबीए
चर्चेचे कारण- वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवणारे निर्माता म्हणून ओळख निर्माण केली.


राजस्थानातील या मारवाडी व्यक्तीचे बालपण आर्थिक विवंचनेतच गेले. आईचे दागिने विकून ज्या दिवशी कर्ज फेडण्याची वेळ आली ते पाहून १७ वर्षीय मनीष मुंदडा यांना प्रचंड वेदना झाल्या आणि तेव्हाच त्यांनी काहीतरी करण्याचा निश्चय केला. लोक उदरनिर्वाहासाठी बिहारमधून अन्य राज्यांत स्थलांतर करतात. मात्र, मनीष बिहारच्या देवघरमध्ये जाऊन सॉफ्ट ड्रिंक विकू लागले. दहावीनंतर नियमित शिक्षण आणि १९ व्या वर्षी घर सुटले. कसेबसे पैसे जमवून बालपणी चित्रपट पाहण्याचा छंद जोपासला. कुटुंबीयांना याबाबतचा सुगावा लागू नये म्हणून एकच चित्रपट दोन शोमध्ये पाहायचे.

दरम्यान, एमबीएच्या शिक्षणाचे स्वप्नही त्यांनी जोधपूर विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनीत नोकरी सुरू केली. दरम्यान, चित्रपटांचा छंद आणि त्यामागचे स्वप्न त्यांना निश्चिंत राहू देत नव्हते. यासाठी एकतर त्यांना मुंबईत जाऊन चित्रपटांसाठी प्रयत्न करावे लागले असते, नाहीतर उद्योग जगतात राहून चित्रपटांशी नाळ जोडावी लागली असती. त्यांनी दुसरा मार्ग निवडला.

दरम्यान, वयाच्या ३२ वर्षांपर्यंत एखाद्या कंपनीत सीईओ आणि चाळिशीपर्यंत कमाई करून चित्रपटनिर्मिती करण्याचा त्यांचा मानस होता. सध्या इंडोरामा ग्रुपच्या नायजेरियास्थित इंडोरामा पेट्रोकेमिकल कंपनीत ते सीईओ आहेत. दुबईत त्यांचे कुटुंबीय राहतात. चित्रपटांशी नाळ जुळण्यामागे एक सुंदर किस्सा ते सांगतात. एकदा रजत कपूर त्यांच्या "आंखो देखी' चित्रपटासाठी निर्मात्याच्या शोधात होते.

निराश होऊन त्यांनी याबाबत ट्विट केले. त्यानंतर काही वेळातच मनीष यांनी कपूर यांना रिट्विट केले आणि म्हणाले, ‘सर, नाराज होऊ नका. मी आपला चाहता आणि चित्रपटात पैसे गुंतवण्यास इच्छुक आहे.’ त्यानंतर आजवर ते चित्रपटनिर्मितीत सक्रिय आहेत.