आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिइमॅजिनिंग इंडिया: मदतीसाठी सदैव पुढे या; कंपनीला फायदा होईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात व्यवसाय सुरू केला. हळूहळू प्रगती सुरू होती. मात्र 1977 मध्ये आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण सरकारने विदेशी कंपन्यांची संपत्ती आणि कामकाजाचे नियम शिथिल केले. 1991 मध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहू लागताच कंपनीने वेग घेतला. प्रतिभासंपन्न कर्मचारी शोधून त्यांना कामावर ठेवण्यात आम्हाला अडचणी आल्या. भारतीय ग्राहक विदेशी उत्पादनाला पसंती तर देत होता, मात्र कंपन्यांच्या वैश्विक अधिकाराच्या विरुद्ध होता. आम्हाला हे खूप उशिरा समजले की, घराबाहेर चालणारी छोटी-छोटी दुकानेही कंपनीच्या व्यवसायाचा खूप मोठा भाग बनू शकतात.
आम्ही भारतीय ग्राहकांनाही समजून घेतले. भारतीय आत्मनिर्भर आहेत. हेच लक्ष्य घेऊन ते जगतात. टिकाऊपण त्यांना आवडते. कंपनीसाठी हेच लक्ष्य जरुरीचे होते. सा-या देशात भारतीय ग्राहकांच्या अभ्यासाअंती एक बाब लक्षात आली ती म्हणजे, उत्पादने सुपर मार्केटऐवजी छोट्या-छोट्या दुकानांतून विकली जातील. जास्तीत जास्त फॅमिली स्टोअर्स गाव, वस्त्यांत आहेत. त्यामुळे हे निश्चित होते की विकसित बाजारात अंमल केलेली रणनीती या ठिकाणी चालणार नाही. आम्ही वेगळा मार्ग निवडला. लोकांची मदत करून व्यवसाय वाढवायचे ठरवले.
गावातील छोट्या दुकानांत वीज नसल्याने कंपनी उत्पादने विकू शकत नव्हती. ही अशी छोटी दुकाने घरातील महिलाच चालवतात. त्यांच्यासाठी पुरुषांच्या तुलनेत कर्ज मिळवणे कठीण असते. अशा दुकान मालकांची आणि त्यांच्या समुदायाची मदत करण्याचे आम्ही ठरवले. बदल्यात फायदा तर कोकलाच मिळणार होता. आमचे बॉटलर्स (कर्मचारी) उत्पादनांसमवेत पाणीही घेऊन आले. त्यामुळे मोठ्या कष्टाने दूरवरून पाणी उपसून आणायचे महिलांचे श्रम कमी झाले. गावात वीज आणण्यासाठीही प्रयत्न केले. त्यामुळे आमचे उत्पादन थंड राहू शकत होते. मुलेही विजेच्या प्रकाशात अभ्यास करू लागली. एका महिलेला मालमत्ता अधिकारही आम्ही मिळवून दिला. त्यामुळे आमच्या उत्पादनाची विक्री सहजसुलभ झाली. महिलांनीही रोजगार वाढवला. इतकेच नाही तर दुस-या लोकांनाही तो उपलब्ध करून दिला.
कंपनीने नुकताच ‘5 बाय 20’ कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे 2020 पर्यंत कंपनी जगातील 50 लाख महिलांना उद्योग प्रशिक्षण देणार आहे. त्यांच्यासाठी आर्थिक संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. भारतातील उद्योगात रुची दाखवणा-या महिलांवर विशेष लक्ष असेल. त्यांच्याशिवाय कंपनीने खेड्यात राहणा-या हजारो लोकांसाठी सौरऊर्जेवर चालणारा मोबाइल कूलर तयार केला आहे. घरी वीज नसणा-यांना याचा फायदा होईल. इकोकूलचा हा ठेला साधारण एका गाडीसारखा दिसतो. मात्र तांत्रिकदृष्ट्या आणि बाजाराच्या गरजेनुसार तो अनुकूलच आहे. इकोकूल सौर कूलर वापरणारी दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडी राहतात. यामध्ये मोबाइल आणि इलेक्ट्रिक वस्तूही रिचार्ज होतात. 2013 च्या अखेरपर्यंत गावांतील दुकानदारांना 1 हजारांहून जास्त इकोकूल्स वाटण्यात आले. या प्रयत्नांचे फलित म्हणजे आज भारतात आमचा व्यवसाय फुलतो आहे. विक्रीच्या बाबतीत विचार केला तर कंपनीच्या यादीत भारत टॉप टेनमध्ये आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीची वाढ शानदार राहिली. कंपनी 2012 ते 2020 दरम्यान भारतात 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. सफलतेचे गमक म्हणजे भारतीय बाजार जसा आहे तसेच त्याकडे पाहा. तुमच्या नजरेतून पाहू नका.