आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा : अभियंता नाहीत तरी पाहतात होंडाचा अभियांत्रिकी विभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय: २६
शिक्षण: पूर्व जपानमधील एका व्होकेशनल हायस्कूलमधून मशिनरी काेर्स

चर्चेत- नुकतीच त्यांनी बनवलेली मिड-इंजिन होंडा स्पोर्ट््स कार एस ६६० टोकियोत सादर केली.
मुकुमोटो यांनी पहिली होंडा कार २६ व्या वर्षी डिझाइन केली. मात्र, होंडा कंपनीमध्ये येण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणीच पाहिले होते. त्यांनी प्राथमिक शाळेत कंपनीचे संस्थापक सोईशिरो होंडावर आधारित कॉमिक वाचले होते. व्यंगचित्र मासिकाची एवढी छाप पडली की त्यांनी होंडामध्ये नोकरी करण्याचे ध्येय बाळगले. उच्च शिक्षणात अभियांत्रिकीची पदवी घेतली नाही. मात्र, सामान्य मशिनरी कोर्स करून होंडामध्ये सहज प्रवेश मिळवला. दुसरीकडे मशिनरी कोर्स पूर्ण केल्यानंतर ते होंडाच्या संशोधन विभागाशी जोडले गेले. तेव्हा त्यांचे वय १९ होते. तीन वर्षांच्या सेवेनंतर कंपनीने नव्या कारच्या डिझाइनवर इन-हाऊस स्पर्धा घेतली. रियो यांनी ४०० स्पर्धकांना मागे टाकत
पहिला क्रमांक पटकावला. रियोंची कल्पना ऐकून कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एवढे प्रभावित झाले की रियो अभियंता नसताना देखील त्यांची मुख्य अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली. २२ वर्षांच्या तरुणाकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याची कंपनीच्या इतिहासातील पहिली घटना होती. कामात अडचण येऊ नये तसेच कल्पनेला वास्तवाची जोड देता यावी यासाठी तरुणांची टीम बनवण्यात आली. मुकुमोटो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कार डिझाइनची संधी मिळाल्यानंतर, लोक पाहताक्षणी आनंदी व्हावेत, अशी कार बनवण्याचा विचार आला आणि त्यात आपण यशस्वीही झालो.
युनिक चेसिस, थ्री सिलिंडर टर्बो इंजिन आणि बीस्पोक सिक्स स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स या तीन फीचरमुळे ही कार अन्य मॉडेलपेक्षा वेगळी ठरते. होंडाचे माजी एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर नोबोरू सॅटो यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, होंडामध्ये शिक्षण आणि वयाला महत्त्व दिले जात नाही. मात्र, लोकांमध्ये काही दडलेल्या गोष्टींची पारख केली जाते. असेच मुकोमोटो यांच्याबाबत झाले. त्यांची क्षमता पाहून २२ व्या वर्षी कंपनीचे महत्त्वाचे काम सोपवण्यात आले.