निसर्गरम्यस्थळ म्हणुन प्रसिध्द असणारे केरळमधील मुन्नार हे हिल स्टेशन फिरायला जाण्यासाठीचे आवडीचे ठिकाण आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यात असणारे हे स्थळ तीन पहाडामधुन वाहणा-या नद्या मुद्रापुझा, नल्लाथानी आणि कुंडला यांच्यामध्ये 1600 मीटर एवढ्या ऊंचीवर वसले आहे. त्यामुळे फिरायची आवड असलेल्या व्यक्ती याकडे नेहमीच आकर्षित होतात. ब्रिटिश शासन असताना हे ठिकाण शोधण्यात आल्याचा इतिहास आहे. त्याकाळी हे ठिकाण ग्रिष्मकाळात इंग्रजाचे निवासस्थान मानले जायचे. या भागातील चहाचे मळेदेखील जगप्रसिध्द आहेत.
या जगप्रसिध्द ठिकाणाची आणखी माहिती खास तुमच्यासाठी देत आहोत...
अनामुड़ी शिखर...
दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर म्हणुन हे ओळखले जाते. विशेष म्हणजे हे शिखर इरविकुलम या राष्ट्रीय उद्यानाच्या आत आहे. या शिखराची उंची साधारण 2700 मीटर इतकी असून, गिर्यारोहकांसाठी आपल्या मर्जीने या शिखरावर चढणे धोक्याचे ठरू शकते. हे शिखर चढण्यापूर्वी इरविकुलम येथील वन्यजीवन प्राधिकरणाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणुन घ्या या आर्कषक जागेबद्दल...