(फोटो सौजन्य- गुगल)
मुंबई - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या शाक्त राज्याभिषेकाचा सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मराठा सेवा संघाची उपसंघटना असलेल्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने या सोहळ्याचे आयोजन केले होते. या शिवराज्याभिषेक साेहळ्यास राज्यभरातील सुमारे एक हजारपेक्षा अधिक मुस्लिम युवकांनी हजेरी लावली होती.
राजपुतांची सत्ता संपुष्टात आल्यावर भारतावर मुस्लिम शासकांची जुलमी सत्ता राहिली. त्यांनी अवघा भारत पाशवी बाहुपाशात समावून घेतला. प्रजेला सुशासन आणि चांगला प्रशासक देण्याऐवजी केवळ लुट, अन्याय, बळजबरी यावर या शासकांचा भर होता. गैरमुस्लिमांवर विशेष कर (झिजिया) लादला जात होता. दिवसा ढवळ्या स्त्रीयांची आब्रु लुटली जात होती. जनावरे कापावीत तशी माणसे मारली जात होती. हिंसाचाराचे थैमान माजले होते. सैतानाच्या राज्यात दैत्यांचा धुमाकूळ सुरु होता. हिंदू धर्म म्हणजेच भारतीय जिवनपद्धती संकटात होती. महाराष्ट्रात तर एकाच वेळी अनेक जुलमी मुस्लिम शासक होते. त्यांच्या अत्याचारांनी राज्य होरपळून निघाले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत मुस्लिम शासकांविरुद्ध प्रचंड घृणा, संताप आणि चीड होती.
शिवाजी महाराजांनी या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. अस्मिता, प्रतिष्ठा, आत्मसन्मान यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देण्याचीही तयारी होती. त्यांना मोलाची साथ मिळाली ती शूर मर्द मराठ्यांची आणि एकापेक्षा एक सरस सरदारांची. त्यांच्या बळावर स्वराज्याचे सुखद स्वप्न साकारले. एकामागे एक अवघड किल्ले स्वराज्यात दाखल झाले. त्यासाठी काही सरदारांनी प्राणांची बाजी लावली. काही वीर कामी आले. तरीही स्वराज्याचे स्वप्न आणि विजयाचा भगवा दिवसागणिक उंचावत होता.
स्वराज्याचा हा भगवा केवळ काही हिंदू सरदारांच्या खांद्यावर नव्हता तर मुस्लिम सुरम्यांनीही तो अभिमानाने हाती घेतला होता. कारण हा एखाद्या धर्माचा ध्वज नव्हता. तर तो मराठी अस्मितेचा, अन्यायाला कडाडून विरोधाचा, चांगल्या सत्तेचा राजमार्ग, दडपशाहीला चिरडणारा संकेत होता. त्याचा सार्थ अभिमान जसा हिंदू सरदारांना होता तसाच मुस्लिमांनाही होता. त्यासाठी रक्त सांडण्यास त्यांचीही तेवढीच तयारी होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, आरमार प्रमुख, तोफखाना प्रमुख, घोडदड प्रमुख होते मुस्लिम....स्वराज्य स्थापनेत या मुस्लिम सरदारांचा होता महत्त्वपूर्ण सहभाग....