जन्म : २ जुलै १९५८
वडील : पत्नी - वासंती (गृहिणी), मुलगा - गोकुल (इंजिनिअरिंग शिकत आहे)
शिक्षण: कोइम्बतूरच्या पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीतून अभियांत्रिकीत पीजी, अण्णा युनि. कोइम्बतूरमधून पीएचडी
चर्चेत : नुकतेच त्यांना इस्रोच्या बंगळुरू सेंटरचे प्रमुख करण्यात आले.
कोइम्बतूर जिल्ह्यातील लहान गाव कोडावडीमध्ये जन्मलेल्या मईलस्वामींनी पदव्युत्तर पदवी घेईपर्यंत
आपला जिल्हा सोडला नव्हता. १९८२ मध्ये ते इस्रोमध्ये दाखल झाले. तेव्हा ते २४ वर्षांचे होते. इस्रोने जेवढे इन्सेट लाँच केले, त्यामध्ये मईलस्वामी यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. त्यांनीच भारतातील सर्वात पहिली चांद्रयान मोहीम पूर्ण केली.
गेल्या वर्षी आव्हानात्मक मंगळयानाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर त्यांनी यशाचे शिखर गाठले. पत्नी वासंती त्यांची सर्वात मोठी चाहती मानल्या जातात. त्यांच्यासंदर्भात वर्तमानपत्रात जे काही छापून येईल त्या कात्रणांची सुंदर सजावट फाइलमध्ये त्या करतात. पतीला थकवाच येत नसल्याचे वासंती यांचे म्हणणे आहे. दिवसभर काम करून घरी आल्यानंतरही रात्री संगणकासमोर बसून चांद्रयान आणि अन्य यानांविषयी चर्चा करतात. तरुणपणी गच्चीवर चंद्र आणि तार्यांची निरीक्षणे करत असत. बर्याचदा वाटायचे, त्यांना थंडी वाजत असेल. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे वासंती यांनी सांगितले.
मईलस्वामी स्वत: एक तामिळ साप्ताहिक "कुंगुमम'मध्ये स्तंभ लिहितात. त्याचे नाव "कैयारुके निला'(या तामिळ कॉलमचा अर्थ आहे- चंद्रही आपल्या आवाक्यात) त्यांच्या संशोधन कार्याचा धडा तामिळनाडूच्या दहावी इयत्तेत शिकवला जातो. त्यांनी आपल्या आयुष्यात विज्ञानाचा धून म्हणून स्वीकार केला आहे. सुटीच्या दिवशी ते मुलांना विज्ञान आणि गणित शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. गेल्या ३५ वर्षांपासून दररोज सकाळी ते गीतेतील दोन पाने नियमित वाचतात. राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालये आपल्या छायाचित्राचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करत असल्याची त्यांची तक्रार आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जातो, मात्र कॉलेज त्याचा गैरफायदा घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मुलगा गोकुलला अभियांत्रिकीच्या शिक्षणात प्रसिद्धी मिळाली आहे. बंगळुरूच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या वर्षी त्याला आयआयटी खरगपूर आणि जीईकडून ५५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.