आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा परिवर्तनवादी जाणता द्रष्टा (ना. धों. महानोर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२७ जानेवारी १९७५. सिल्लोडला यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत मुख्यमंत्री वसंतराव नाईकांसह १५ मंत्र्यांच्या व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माझ्या कवितेची मैफल झाली. त्या वेळी पळसखेडला यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री वसंतदादा िदवसभर थांबले. साहित्य, खेडी, शेती यावरील चर्चेदरम्यान यशवंतराव चव्हाणांनी मला शरदराव पवार यांच्याशी जोडून टाकलं. नातं घट्ट झालं…

पुरोगामी महाराष्ट्राची उभारणी करताना दलित, पीडित, भटके-विमुक्त आणि थेट वाडी-वस्तीतल्या दु:खितांपर्यंत शरद पवार प्रत्यक्ष पोहोचले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं, असा निर्णय घेतला. मराठवाड्यात मोठा विरोध. इतरत्रही. ते निर्णयापासून ढळले नाहीत. सत्ता मिळाली नाही तरी चालेल. हे परिवर्तन करायचा पक्का निर्धार होता. तो १९९४ ला पूर्ण केला. हे म्हणावं तितकं सोपं नव्हतं. सत्तेचं विकेंद्रीकरण करून थेट तालुका- गावपातळीवर सत्ता जिल्हा परिषद व सहकारी व्यवस्थेतून यशवंतरावांनी उभी केली. ितचं नेमकं रूप व खऱ्या अर्थानं स्त्रियांचा व लहान-माेठ्या जाती-जमातींचा प्रत्यक्ष वाटा, राखीव जागा व स्त्रियांच्या सबलीकरणाचं धाेरण अाखून प्रत्येक वेळच्या मुख्यमंत्रिपदावरून केलं. असं खूप माेठं खऱ्या अर्थानं ज्याला ‘परिवर्तन’ व सत्तेतला सहभाग म्हणता येईल, असा महाराष्ट्र उभा करत राहिले. जाणते राजकारणी, समाजकारणी, िवचारवंत व खेड्यातला शेवटचा माणूस यांना जवळ केलं. त्यांचं बळ घेऊन मी उभा अाहे, असं ते म्हणतातदेखील. अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्राची उभारणी हाेत असताना, जनतेची स्वप्नं साकार हाेताना पाहतानाच केंद्रातल्या नेत्यांनी ‘पुलाेद’ शासन बरखास्त केलं. शरदराव यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तरीही शरदराव थांबले नाहीत. अधिक वेगानं, नव्या िजद्दीनं कामाला लागले. रात्रंदिवस महाराष्ट्रभर लाेकांमध्ये िमसळायचे. अाधार द्यायचे.
१९ जुलै १९८३ ला िवधान परिषदेत ‘दुष्काळ’ या चर्चेसाठी ‘पाणी अडवा पाणी िजरवा’ असा प्रस्ताव मी मांडला. १९८३ ला, १९८४ ला वर्षभर दाेन्ही सभागृहांत दीर्घ चर्चा झाली. मी पूर्वीचे अनेक दुष्काळांचे संदर्भ, पाणी-शेती व्यवस्थापन, लहान-माेठी धरणं व एकत्रित पाणलाेट िवकास याेजना, फलाेद्यान, वनश्री अशी मांडणी केली. हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी मी शरदराव यांच्याकडे बसलाे. माहिती, िटपणं घेण्यासाठी. एका तासाएेवजी ते तीन तास सारखे अाकडेवारीनिशी देशातले व जगातले संदर्भ देत हाेते. त्यांची स्मरणशक्ती व पक्की अाकडेवारी मी िवसरू शकत नाही.

१९९० ला शरदराव पुन्हा मुख्यमंत्री झाले. मला पुन्हा सभागृहात घेतलं. ‘जलसंधारण’ असं स्वतंत्र पाणलाेटाचं खातं िनर्माण केलं. त्याला जाेडून शंभर टक्के सबसिडीवर ‘काेरडवाहू फळबाग याेजना’ अाणण्याचा तसेच सामाजिक वनीकरणाचा िनर्णय घेतला. शेततळी, िठबक िसंचन सबसिडी याेजना घेतली. या याेजना महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यात िदल्या; दुसऱ्या हरितक्रांतीचं नवं अाकाश साकारलं. राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री असताना व केंद्रात संरक्षणमंत्री, १० वर्षे कृषिमंत्री असताना मुख्यत: शेती, पाणी, जगभरचं नवं तंत्रज्ञान व शेतीची अार्थिक सुधारणा, सुबत्ता कशी हाेईल, याचं माेठं काम केलं. करवून घेतलं.

दुष्काळ, पाणीटंचाई, अस्मानी संकटं संपणारी नाहीत. िनसर्ग खूप बदलला तरीही अापण हळूहळू कसे उभे राहू शकताे, हे सांगण्यासाठी ७५ वर्षांचे शरद पवार मराठवाड्यामध्ये ४७ िडग्री तापमान असताना अाजारपण, पायात दुखापत असतानाही फि‍रले. असा हा सच्चा शेतकरी नेता. भारताच्या प्रत्येक राज्यातील शेतीच नव्हे, तर अन्य िकती तरी प्रश्न... ितथलं पाेटेन्शियल... जे चांगलं ते राजकारण बाजूला ठेवून, समाजकारण केंद्रस्थानी ठेवून जाणून घेतलं. अमेरिका, इंग्लंड, माॅरिशस, इस्रायल इत्यादी देशांत साेबत हाेताे. ितथल्याही राज्यकर्त्यांशी स्नेह, तिथलं चांगलं ते महाराष्ट्रात, देशात रुजवलं; त्याचं कारण एकच... माझा महाराष्ट्र कृषी-अाैद्याेगिक पद्धतीनं अार्थिकदृष्ट्या सशक्त व्हावा हाच त्यांना लागलेला ध्यास.

साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकाेश, संस्कृती काेश, भाषासंवर्धन याशिवाय ग्रंथालय सेवकांची वेतनवाढ, ग्रंथालयांना बळ देण्याचं काम त्यांनी जाणीवपूर्वक केलं. १९७८च्याच काळात नवलेखक अनुदान याेजना, नियतकालिकांना अनुदान, पत्रकारिता यासाठीही निर्णय घेतले. व्ही. शांताराम, श्याम बेनेगल, विजया मेहता, पुरुषाेत्तम दारव्हेकर, महानोर अशी फक्त सात कलावंतांची समिती ‘चित्रपट, नाटक, सांस्कृतिक कार्य’ यासाठी नेमली. मराठी िचत्रपट करपरतीची तीस लाखांची याेजना त्यातलीच अाहे. ४ एप्रिल १९९०ला मी िवधान परिषदेत कला अकादमीचा ठराव मांडला. ताे त्वरित मंजूर करून महाराष्ट्राला ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’ िदली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जाेशी, गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, य. दि. फडके, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, जब्बार पटेल असाेत की भारतरत्न पं. भीमसेन जाेशी, भारतरत्न लता मंगेशकर, अाशाताई, सुधीर फडके, िकशाेरी अामाेणकर, रवींद्र साठे ते अाजच्या नव्या िपढीच्या िचत्रपट, नाटक, साहित्य या क्षेत्रातल्या उमेदीच्या नव्या कलावंतांची साेबत करणं त्यांना अावडतं.
गाेविंदराव तळवलकर, माधव गडकरी, िदलीप पाडगावकर असे नामवंत िवचारवंत, पत्रकार असे पन्नास तरी मी त्यांच्याजवळ चर्चेसाठी बसलेले जवळून पाहिले. अनंतराव भालेराव यांच्या संपूर्ण लेखन प्रकल्पांना, अग्रलेखांना, संग्रहांना मदत करणं असाे की मराठवाडा साहित्य परिषदेच्या नाट्यगृहाला; हे सगळं महाराष्ट्राचं वैभव... यामुळेच महाराष्ट्र वैभवशाली बनताे, अशी त्यांची भावना अाहे, त्यापाेटीच या सकलांचा महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी उपयाेग करून घेतला.
शरदराव यांची अाई स्व. शारदाबाई पवार यांनी लहानपणापासून िशक्षणाची, नव्या िवचारांची, सामाजिक प्रश्न व श्रमाच्या प्रतिष्ठेची िशकवण रुजविली. शेतकरी कामगार पक्षाच्या िवचारांचं बीज रुजवलं. असा लहानपणाचा भक्कम पाया शरदराव यांनी जिवापाड जपला. अायुष्यभर चांगल्या माणसांच्या जगभरच्या िवचारांनी, पुस्तकांनी, कला-संगीताने स्वत:ला भरभरून घेतलं. राज्यातल्या थेट खेड्यात, शहरात अापल्या परीनं ते रुजविलं, वाढविलं. घेतलं ते अाेंजळी-अाेंजळीनं वाटत गेले. राजकारणाशिवाय सकलांचं व्यासपीठ म्हणून त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, ‘बारामती कृषी प्रतिष्ठान’, ‘शारदा प्रतिष्ठान’ ही व अशी अनेक प्रतिष्ठानं महाराष्ट्रात उभी केली. ती अाज दीपस्तंभासारखी सगळ्याच िवषयांना व सकल समाजाला कवेत घेऊन उभी अाहेत. ‘गदिमा’, ‘पुल’, ‘कुसुमाग्रज’, ‘बालकवी’ अशी िकती तरी भव्य स्मारकं उभी केली. एकंदरीत, अथक परिश्रम अाणि कामाचा हव्यास असणारं शरद पवार यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व माझ्या पाहण्यात नाही. त्यांना पंचाहत्तरीनिमित्त अाराेग्य व सुखाचे, अानंदाचे िदवस िमळाेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ना. धों महानोर,
ज्येष्ठ साहित्यिक