आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्य लोक आणि पृथ्वीची देखभाल करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली कथा : २००७मधील घटना आहे. योगेश मलखारेची पत्नी रमाला पुण्याच्या वायसीएम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. इथे तिच्यावर स्वस्तात उपचार झाले, परंतु जेवण घरून आणावे लागत होते. दुसऱ्या दिवशी रमा पतीला म्हणाली की, घरून दोन लोकांचे जेवण घेऊन या. कारण तिच्या जवळच्या बेडवर एका महिलेने नुकताच बाळाला जन्म दिला होता. तिने सात महिन्यांपूर्वीच आपल्या पतीली गमावले आहे. ती आपल्या बाळाला दूध पाजू शकेल, एवढे जेवणसुद्धा देण्याची तिच्या वडिलांची ऐपत नाही. हे दृश्य पाहून मलखारे दांपत्याला वाइट वाटले. जोपर्यंत रमा हॉस्पीटलमध्ये होती, तोपर्यंत योगेश गरजवंतांसाठी जेवण आणत राहिला. ही परंपरा त्याने पुढेही कायम ठेवली. आई आणि आई होणारे स्वकियांचे पोषण करण्यास सक्षम नव्हते, अशा लोकांचीही तो मदत करत होता. आर्थितदृष्ट्या खूप चांगली स्थिती नसतानाही कुटुंबाने हे कार्य २०१२ पर्यँत सुरू ठेवले. तेव्हा सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत गरोदर महिलांना हॉस्पीटलमध्ये जेवण उपलब्ध करण्यास सुरुवात केली होती. मात्र, योगेश आणि रमाचा प्रवास यापेक्षा कितीतरी पुढे गेला होता. योगेश एकेदिवशी मानसिकृष्ट्या अस्थिर व्यक्ती ४५ वर्षीय व्यंकटेश नायडूंना भेटला. तो रस्त्यावर भीक मागत होता. त्याने व्यंकटेशला येरवडा मेंटल हॉस्पीटलमध्ये दाखल केले. नंतर त्याच्याबाबत माहिती घेतली असता असे कळाले की, ती व्यक्ती तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीतील एका गावचा रहिवासी असून गेल्या वर्षांपासून पुण्याच्या रस्त्यांवर भीक मागत होती. नायडू श्रीमंत होते. त्यांच्या कुटुंबियांकडे १६० एकर जमीन होती. त्याने नायडूची आणि त्याच्या कुटुंबियांची भेट करून देण्याचा प्रयत्न केला. 
नायडूच्या कुटुंबियांचा आनंद योगेश कधीच विसरू शकला नाही. तेव्हापासून युवा मातांना जेवण देण्यासोबतच हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी पोहोचवणे त्याचे नियमित काम बनले. पुण्यातील पिंपरी येथील ३६ वर्षांचा योगेश २०१६ पासून स्माइल प्लस सोशल फाउंडेशन नावाची एनजीओ चालवत आहे. या माध्यमातून त्याने ३०० लोकांचे यशस्वी पुनर्वसन केले आहे. यापैकी ३३ लोकांना त्यांच्या कुटुंबियांची भेट करून दिली. ही चांगली सेवा करत असताना त्याने कायदा कधीच हातात घेतला नाही. प्रत्येक प्रकरणामध्ये नियमांचे पालन केले. मानसिकरित्या आजारी लोकांना आधी तपासणीसाठी हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते. नंतर त्यांचे येरवडा हॉस्पीटलमध्ये पुनर्वसन केले जाते. अनाथांना बालगृहामध्ये दाखल केले जाते. हेच बालकल्याण समितीचे नियम आहेत. तथापि, वयस्कर लेकांना वृद्धाश्रमात दाखल करत शासकीय नियमांतर्गत नामांकन केले जाते. सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो शोध कार्य सुरू करतो आणि पुन्हा आपल्या पातळीवर पुनर्वसनाचा प्रयत्न करतो. 
दुसरीकथा : एकीकडेयोगेश लोकांची देखभाल करण्याच्या कामात गुंतलेला असतानाच, दुसरीकडे मुंबईजवळील ठाणे महापालिकेने आपल्या पद्धतीने पृथ्वीची देखभाल करण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यांनी गणेशोत्सवासाठी सायकल शेअरिंग सुविधा सुरू केली आहे. सुरुवातीला ५०० सायकल ५० मोठ्या स्टँडवर पार्क करण्यात आल्या. त्या ताशी १० रुपये भाड्याने दिल्या जातात. यासाठी वापरकर्त्याला कमीत कमी २५० रुपयांचे स्मार्ट कार्ड खरेदी करावे लागेल. जीपीएस लावण्यात आलेली सायकल महापालिका हद्दीत कुठेही घेऊन जाता येईल. सायकल आणि ती वापरणाऱ्यास होणारी कोणतीही नुकसान भरपाई गटविम्यांतर्गत केली जाईल. प्रदूषण कमी करणे आणि प्रत्येक प्राण्यासाठी जीवनाची गुणवत्ता सुधारणे हाच यामागील उद्देश आहे. 

फंडा असा आहे की : आपण सर्व आपल्या निर्माचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे अन्य लोक आणि पृथ्वीची देखभाल करत त्याचा संकल्प करण्याची वेळ आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...