आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: देण्याच्या वृत्तीनेच श्रीमंत बनते तुमचे शहर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की, मुंबईमध्ये १९५६ ते २०१७ या कालावधीत काहीही बदलले नाही. जलमय होणे मुंबईकरांसाठी कोणतीच नवीन बाब नाही. ही नैसर्गिक आपत्ती मी आपल्या जीवनकाळात २० पेक्षा अधिक वेळा सोसली आहे. सर्वात भीषण परिस्थिती २६ जुलै २००५ रोजीची होती. तेव्हा शहरामध्ये ४०० जण दगावले होते. मुंबईकर साधारणत: अशा गोष्टींची परवा करत नाही, परंतु २६/११ च्या आठवणींनी त्यांना या वेळी अस्वस्थ केले आहे. ते आपले सहकारी मुंबईकरांच्या मदतीसाठी सज्ज दिसले. मंगळवारी मुंबई ३१५ मिमी पाण्यात बुडाली होती, परंतु मुंबईकरांनी तेच केले ज्याची त्यांना सवय आहे. 
 
शहराची लाइफ लाइन असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वे बंद होत्या. लोकांना कमरेपर्यंतच्या पाण्याचा सामना करावा लागला. मात्र, लोकांनी आपल्या मनाचे आणि घराचे दरवाजे पाण्यामुळे अडकलेल्या लोकांसाठी उघडले. न्यायालयांमधील कोर्ट रूम लोकांना राहण्यासाठी उघडण्यात आले. रेल्वे स्थानकांनी अन्नाच्या शेवटच्या घासापर्यंत लोकांना जेऊ घातले. एवढेच नाही तर त्यांनी एक पैसाही कुणाकडून घेतला नाही. हेदेखील नवीन होते. मंदिरे, दुरुद्वारा आणि मशीदींचे दरवाजे सर्वांच्या आश्रयासाठी उघडण्यात आले. या वेळी तर सोशल मीडियानेसुद्धा मुंबईकरांचे हात बळकट केले. नव्या पिढीने ज्यांना मदतीची गरज होती आणि ते मदतीसाठी तयार होते, त्यांना स्वत:शी जोडले. यासाठी मुंबईरेन्स डॉट ओआरजी आणि रेनहोस्टसह अनेक हॅशटॅग चालले. यांनी अनेक दु:खद कथांचे स्मरणीय अनुभवांमध्ये रूपांतर केले. 

लोअर परेलच्या बॉम्बे कँटीन नावाच्या रेस्टॉरंटमधील किचन बंद करण्यात आले होते. कारण खाण्या-पिण्याचे सर्व साहित्य संपले होते. मात्र, तरीही रेस्टॉरंट सर्व लोकांच्या आश्रयासाठी खुले ठेवण्यात आले. या भागामध्ये शहरातील बहुतांश हॉस्पिटल्स आहेत. इथे लोकांना चहा आणि कॉफी वितरित करण्यात आली. त्यांनी असे ट्विटही केले की, गार पेयासाठी रेस्टॉरंट खुले आहे, तेदेखील मोफत. यावरून मला १९५६ मधील एका कथेची आठवण झाली. आमच्या कुटुंबातील सर्वात वृद्ध काका बॉम्बेला आले होते. आता ती मुंबई आहे. ते नोकरीच्या शोधात आले होते आणि दिवसातील तिन्ही काळ थिरुशुर मेसमध्ये नाष्टा-जेवण करत होते. कारण तिथे दिवसभराच्या जेवणाची किंमत फक्त ५६ रुपये होती. याचादेखील एक युनिक पॉइंट हा होता की, इथे येणारे ७० टक्के तरुण जॉबलेस आणि नोकरीच्या शोधात होते. 

त्यांना आपल्या जेवणासाठी एकही पैसा देण्याची गरज नव्हती. मात्र, अट एकच होती की, जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा सर्व पैसे द्यावे लागतील. तेदेखील हप्त्याने देण्याच्या सुविधेसह. ही शहरातील लोकांच्या मदतीची अनोखी पद्धत तेव्हाचे मालक रामास्वामी यांनी अवलंबली होती. तेव्हा माझ्या काकांनी त्यांना विचारले की, तुम्ही कशी या शेकडो बेरोजगारांवर नजर ठेवता? रामास्वामी म्हणाले, ‘कॅश काउंटरच्या वर गणपती आहेत, तेच हिशेब ठेवतात. जर लोकांनी पैसे दिले नाहीत तर तेच त्यांना त्याची जाणीव करून देतात. मला तर नियमितपणे जेवण करणाऱ्या अनेक लोकांचे नावही माहीत नाही, परंतु त्यातील बहुतांश लोक धोका देत नाहीत. कोणी दिलाच तरी फरक पडत नाही. मी तर भुकेल्यास खाऊ घातले आहे.’ अनेक आपत्तींनंतर मुंबई आजही श्रीमंत आहे, यात कोणतेच आश्चर्य नाही. 
 
फंडा असा कोणतेही शहर तेथील नागरिक कमावत असलेल्या पैशांमुळे नव्हे, तर त्यांच्या कार्यांमुळे श्रीमंत बनते. 

raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...