आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: छोटे समजले जाणारे व्यवसायही मोठे झालेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरविंदला आपले कान डॉक्टरांना दाखवायचे होते. मात्र रात्री उशीर झाल्याने तो घरीच थांबला. रात्री ११.३० वाजता एका आयटी कंपनीत एचआर एक्झिक्युटिव्ह असणारी त्याची पत्नी रेखा घरी आली. सकाळच्या नाष्ट्यासाठी घरात काहीच नाही हे तिच्या लक्षात अाले. तिने तत्काळ आपला मोबाइल हातात घेतला आणि एक अॅप आेपन करून तिने भराभर ऑर्डर टाइप केल्या. एक आेटचे पॅकेट, छोटे ब्रेडचे पॅकेट आणि इअर बड अशी ऑर्डर तिने दिली. सकाळी दुधाच्या पॅकेटबरोबर हे सगळे पदार्थ सकाळी सातच्या आत तिच्या घरात आले. जर तुम्ही गुरूग्रामला राहत असाल तुम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंची चिंता करण्याची गरज नाही. ‘मिल्कबास्केट’ या अॅपवर तुम्हाला रोज लागणारे सगळे सामान मिळते. ‘बिगबास्केट’ या किराणा सामानाच्या चेनसारखे मिल्कबास्केट ही सुद्धा एक नावाजलेली कंपनी म्हणून आेळखली जाऊ लागली आहे. ऑर्डर केल्यावर तुम्हाला लागणारे नाष्ट्याचे पदार्थ वेळेवर पोहोच होतात. 
 
तुम्हाला कंपनीच्या मोबाइल अॅपमधून ५०० रुपये डिपॉझिट करावे लागतात. त्यानंतर तुम्ही हवी ती आणि वाटेल तेव्हा ऑर्डर देऊ शकता. पैसे संपल्यावर पुढच्या ऑर्डरच्या आधी तुम्हाला पुन्हा कंपनीला सामानाचे पैसे द्यावे लागतील. सगळी दुकाने बंद झाली असली तरी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. या वस्तूंवर डिस्काउंट नाही. मात्र सर्व्हिस चार्जही लागत नाही. मिल्कबाॅस्केट दुधासारख्या गरजेच्या वस्तूंसाठी सुरू झाली होती. मात्र कालांतराने ग्राहकाला हव्या असणाऱ्या गरजेच्या वस्तूंची सेवाही या कंपनीने सुरू केली. सध्या दुधाचे फक्त ३५ टक्के ग्राहक त्यांच्याकडे आहेत. मात्र उर्वरित ६५ टक्के ग्राहक हे इतर अत्यावश्यक वस्तूंचे आहेत. 
 
इतर किराणा व्यावसायिक १५ ते २५ टक्के नफा कमवतात. मात्र मिल्कबास्केट दूध उत्पादनांमध्ये फक्त टक्के नफा कमावतो. २०१५ मध्ये अनंत गोयल, अनुराग जैन, आशिष गोयल आणि यतीश तलावडिया यांनी ही कंपनी सुरू केली होती. आज या कंपनीकडे पाच हजारांहून जास्त ग्राहक आहेत. गेल्यावर्षी यापेक्षा कमी ग्राहक असतानाही कंपनीने १० कोटींचा व्यवसाय केला होता. जून २०१८ पर्यंत ५० हजार ग्राहक करण्याचे कंपनीचे लक्ष आहे. शहर म्हणून विकसित होणाऱ्या भारतातील गावांवर सध्या या कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. ज्या शहरांची लोकसंख्या जास्त आहे आणि कामाचे तास जास्त आहेत अशी शहरे सध्या या कंपनीचे टार्गेट आहे. सध्या १५ पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांचे काम सुरू आहे. पुढच्या दोन वर्षांत जास्तीत जास्त तीन शहरात काम सुरू करण्याचे धोरण असले तरी ग्राहक साडेतीन लाखांपेक्षा जास्त करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. 
 
दोन वर्षांपूर्वी जेव्हा ही कंपनी सुरू करण्याची आयडीया गुंतवणूकदारांपुढे ठेवण्यात आली तेव्हा फक्त दोन गुंतवणूकदार पाच लाख डॉलरची गुंतवणूक करण्यास तयार झाले. दोन वर्षांनंतर गेल्या महिन्यात मात्र तब्बल ४५ पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली. ती किती केली हा आकडा मात्र जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र येत्या काही दिवसांत किराणा व्यवसायात देशभर क्रांती करण्याचा कंपनीचा विचार आहे. भविष्यात सरासरी २६ लाख कोटींच्या घरात गुंतवणूक करण्याचे कंपनीने ठरवले आहे. 
 
फंडा असा आहे की : सध्या जग २४/७ अशा जीवनशैलीत जगत आहे. दुधवाला, पेपरवाला, चौकीदार अशा कमी प्रतीच्या समजल्या जाणाऱ्या व्यवसायातही गुंतवणुकीच्या मोठ्या संधी सध्या उपलब्ध झाल्या आहेत. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...