आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: पालक आणि शिक्षक देवापेक्षा कमी नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीतील झोपडपट्टी,आझादपूर, बडा बागच्या रेल्वे ट्रॅकच्या कडेला निसार अहमदचे दहा बाय दहाचे घर आहे. तेथे तो बहीण आई-वडिलांसह राहतो. छोटा परिवार असल्याने त्यांची ती छोटीशी खोली गरजेप्रमाणे रोज नवनवा आकार घेते. किचनपासून बेडरूमपर्यंत आणि टीव्हीपासून हॉलपर्यंत सगळे प्रकार गरजेनुसार आकार घेतात. या घरात दोन माणसे कमावणारे आहेत. एक म्हणजे निसारचे वडील मोहंमद हक, जे सायकल रिक्षा चालवून २०० रुपये रोज कमावतात आणि दुसरी व्यक्ती म्हणजे निसारची आई शफिकुनिशा, जी धुणी-भांडी करून कुटुंबाला हातभार लावते. चार जणांचे पोट भरण्यासाठी या घरात रोज जगण्याची मॅरेथॉन सुरू असते. सगळेच कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करतात. 
 
दीड वर्षापूर्वी या कुटुंबावर २८ हजार रुपये व्याजाने घेण्याची वेळ आली होती. रनिंगसाठी आवश्यक असणाऱ्या काही वस्तू, स्पोर्ट शूज आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मोहंमद यांनी हे पैसे घेतले. आपल्या मुलावर आणि त्याचे स्पोर्ट टीचर सुरेंद्र सिंग यांच्यावर त्यांचा खूप विश्वास होता. निसारमध्ये एका धावपटूचे नैसर्गिक गुण आहेत, हे सिंग यांना माहीत आहे. त्यामुळेच ते निसारला एक अॅथलिट म्हणून पुढे आणू इच्छित आहेत. एका इंटरझोनल स्पर्धेसाठी निसारला उतरवायचे असल्याने त्याला स्पोर्ट शूज आणि इतर साहित्य आवश्यक होते. निसारनेही आपल्या वडिलांचा आणि खेळाच्या शिक्षकांचा विश्वास रास्त ठरवला. काही दिवसांपूर्वी झालेल्या इंटरझोनल स्पर्धेत निसारने नेत्रदीपक कामगिरी केली. आपण एका उभरत्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला शोधून काढल्याचा अभिमान सिंग यांना त्या वेळी झाला. सध्या सुनीता राय या नव्या कोचच्या मार्गदर्शनाखाली निसारचे प्रशिक्षण सुरू आहे. रोज सकाळी पाच वाजता छत्रसाल स्टेडियमवर निसार प्रॅक्टिससाठी जातोय. 

शाळेतून लवकर घरी येऊन सरावासाठी पुन्हा संध्याकाळी मैदानावर जातो. गेल्या शनिवारी ईदच्या दिवशी निसारचे मोठे कौतुक झाले. दिल्ली अॅथलेटिक्स मीटमध्ये त्याने दोन गोल्ड मेडल मिळवले. निसार दिल्लीचा सगळ्यात केवळ वेगवान धावपटूच ठरला नाही, तर त्याने दोन राष्ट्रीय रेकॉर्डही मोडले. आता त्याच्या दहा बाय दहाच्या घरात टीव्हीला वेगळे स्थान मिळाले आहे. टीव्हीच्या आसपास त्याने जिंकलेल्या सर्व ट्रॉफ्या सजवण्यात आल्या आहेत. त्यात २०१५ची नॅशनल गेम्सची ट्रॉफीही आहे. त्यात निसार बेस्ट अॅथलिट ठरला होता. निसारच्या पालकांनी निसारला कधीच पळताना पाहिले नाही, मात्र स्पोर्ट शूज घालून ताे जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा त्याच्या वडिलांमध्ये हत्तीचे बळ येते आणि आपल्या सायकलचे पॅडल ते दुप्पट ताकदीने मारतात. त्यांना व्याजाने घेतलेले २८ हजार रुपयेही फेडायचे आहेत. आपण गरिबीमुळे त्याला सगळ्याच सुविधा देऊ शकत नसल्याचे दु:खही आहे. मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेल्या त्याच्या स्पर्धा जेव्हा निसारचे आईवडील पाहतात तेव्हा त्यांची छाती अभिमानाने फुगते. प्रत्येक घरात प्रगतीच्या अशा अनेक कथा आहेत. पालकांच्या त्यागाच्या आणि प्रशिक्षकाच्या प्रतिभेच्या गोष्टी प्रत्येक गावात सापडतील. 

मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 

raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...