आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: छोट्याशा मदतीने तरुणांनी निश्चित यशाचा मार्ग सापडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळचा मुख्य बाजार ख्वैरमबंदमधील काही फेरीवाल्यांसमोर दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी जास्त गर्दी असते. हे फेरीवाले पाणीपुरी, चहा, उसाचा रस, आइस्क्रीम, तर काही जण स्थानिक स्नॅक्स विकतात. गणिताची आवड असलेला माझा एक मित्र त्याच्या कामानिमित्त त्या फेरीवाल्यांसमोर अनेक तास उभा होता. त्याने पाहिले की या फेरीवाल्यांपुढील तरुण ग्राहक खुश होते, मात्र काही ग्राहक एका दुकानातून दुसऱ्या दुकानात सारखी ये-जा करत होते. आपल्या दुकानातून ग्राहक दुसऱ्या दुकानात गेल्यावर या फेरीवाल्यांना अजिबात दु:ख होत नव्हते. दुपारी तीन ते रात्री आठ ही या फेरीवाल्यांच्या व्यवसायाची मुख्य वेळ असते. माझ्या मित्राला मात्र ही ग्राहकाची ही ये-जा जरा विचित्र वाटली. मणिपूरची लोकसंख्या २७.२१ लाख असून तेथील सुमारे ७.०१ लाख युवक बेरोजगार आहेत. 
 
शेअर्ड कस्टमर सिस्टमने या लोकांच्या आयुष्यात आनंद आला. हे सगळे लोक केईडीआे (कांगलाइ इकॉनॉमी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) अंतर्गत काम करतात. हा एक सेल्फ एम्प्लॉइड ग्रुप आहे. या संस्थेत सुमारे १०० व्हॉलेंटियर इम्फाळमध्ये काम करत आहेत. स्वादिष्ट स्नॅक्स विकून हे सगळे महिन्याला जवळपास २४ हजार रुपये नफा कमावतात. जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यामागचे एक कारण हे आहे की, प्रत्येक स्नॅक्समध्ये स्थानिक लोकांच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ टाकलेले असतात. इम्फाळची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी २० एप्रिल २००७ ला केईडीआे सुरू करण्यात आले. वर्क कल्चर आणि स्थानिक लोकांच्या मनात येथील पदार्थांची आवड निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश होता. यातील काही लोक दूध, केरोसिन, खाद्यतेल आणि फूड प्रॉडक्टच्या वितरणाचे काम करतात. काही जण भाजीपाला उगवणे तो घरोघरी पोहोचवण्याचे काम करतात. खेड्यातील अनेक तरुणांना कष्ट करण्याची इच्छा आहे, मात्र लहान-सहान व्यवसाय सुरू करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी गुंतवणूक लक्षात घेता काही स्थानिक राजकारण्यांनी पार्लमेंट सेक्रेटरी एल. सुसिंद्रो मिताई यांची भेट घेतली आणि स्थानिक बँकाकडून २० हजार रुपयांचे कर्ज देण्याला मंजुरी मिळवली. 
 
यावरून मला १९९३ची एक घटना आठवली. के. राजू या भाजीवाल्याला मुंबईच्या उपनगरात भाजीची गाडी लावण्यासाठी माझ्या आईने दाेन हजार रुपयांची मदत केली होती. आईचे हे वागणे मला त्यावेळी आवडले नव्हते. कारण एक तर तो के. राजूला आम्ही जास्त आेळखत नव्हतो आणि माझा पगार दोन हजारांपेक्षा फक्त थोडासा जास्त होता. भाजीपाल्याची जास्त माहिती नसल्याने जे व्हायला नको तेच झाले. राजूला या व्यवसायात मोठे नुकसान झाले. आईला तिच्या चुकीची जाणीव करू देण्याची संधी मला मिळाली, मात्र आईने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा त्याला दोन हजार रुपयांची मदत केली. त्याची चूक सुधारण्याची एक संधी त्याला द्यायला हवी असे आईचे म्हणणे होते. पुढच्या तीन वर्षात मात्र राजूने आपल्या व्यवसात नेत्रदीपक प्रगती केली. राजूचा व्यवसाय मुंबईच्या अनेक उपनगरात पोहोचला. त्यावेळी आई मला म्हणाली, ‘तुला शिक्षणात जशी तुझ्या काकांनी मदत केली तशा मदतीची अनेक तरुणांना आज गरज आहे. आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येकात काही ना काही गुण असतात. मी जर राजूच्या गरजेकडे दुर्लक्ष केले असते तर तो चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता होती.’ आईच बरोबर होती हे मला तेव्हा समजले. राजू आज कल्याण मंडईतील सगळ्यात मोठा डिलर आहे. त्याच्या ठेल्यावर रोज लाखोंची उलाढाल होते. 

फंडा असा आहे की : आपल्याआसपास असे अनेक तरुण आहेत ज्यांना छोट्याश्या मदतीची आवश्यकता आहे. आपण त्यांना मदत केली तर ते नक्कीच आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी उडी घेऊ शकतात. 

raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...