आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी वयाची मर्यादा आड येत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय ३०-४० : कोटेश मुक्कमाला हा अमेरिकेतील एक आयटी प्राेफेशनिस्ट आहे. आपल्या आयटी करिअरवर जसे त्याचे प्रेम आहे तसेच प्रेम त्याला ऑर्गेनिक दुधाप्रतीही आहे. माणसाला मिळालेल्या नैसर्गिक साधनांवर त्याचा भरोसा आहे. गरीब शेतकऱ्याने जर श्रेष्ठ जातींच्या गायींची ब्रीडिंग केली तर तो शुद्ध दूध अफोर्डेबल किमतीत देऊ शकतो, असा त्याचा विश्वास आहे. अमेरिकेत एक जॉब करण्याबरोबरच त्याने तेलंगणा येथे एक ऑर्गेनिक फॉर्मही विकसित केला आहे. नऊ एकरांच्या या जमिनीवरील आठ एकरांवर जनावरांसाठी चारा उगवण्याचे काम केले जाते. तेथे ७० गायी आणि ८० म्हशी अशी सुमारे १५० जनावरे आहेत. 
 
येथून फक्त एक हजार लिटर दूध निघत असले तरी दूध काढल्यानंतर फक्त दोन तासांत त्याचे वितरण केले जाते हे महत्त्वपूर्ण आहे. दूधाचे उत्पन्न आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आयटी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या महिन्यांत निघालेले दूध, काेणत्या महिन्यात कोणत्या जनावराला आजार झाला, तो किती दिवस होता, आजाराचे कारण आदी माहिती आयटी विभागाकडून संकलित केली जाते. कोटेशला ब्रीडिंगमध्येही काम करायचे आहे. या सगळ्यांमुळे पुढच्या पाच वर्षांत देशांतील पशुपालनाचा व्यवसाय २० टक्क्यांनी नक्कीच फायदेशीर होईल. 
 
वय ५५-६० : संध्याकाळचे सात वाजले आहेत. चेन्नईतील अयनावरम या उपनगरात एका घराबाहेर स्पोर्ट ड्रेस घातलेली काही माणसे उभी आहेत. कदाचित ते आत्ताच एखादी मॅच खेळून किंवा जॉजिंग करून आली असावीत. ‘कॉफी घेण्यासाठी आतमध्ये या’ अशी पाटी त्या घराच्या दारावर लटकवलेली आहे. स्टेट बँकेतून रिटायर्ड झालेल्या व्ही. अनंत नारायणन यांचे हे घर आहे आणि त्यांनी निवृत्त झाल्यानंतर कॉफी शॉप उघडण्याचा निर्णय घेतला होता. अाज त्यांचा निर्णय किती बरोबर होता हे दिसत होते. घरातच उघडलेल्या या कॉफी शॉपमध्ये काम करायला इतर कर्मचारी असले तरी नारायणन स्वत:च्या हाताने कॉफी बनवतात. 
 
वय ८-१८ : साहस सुधाकरला कॉम्प्युटर गेम खेळण्याची किंवा वेबसाइटवर ब्राउजिंग करण्याची आवड नव्हती. मात्र, एकदा त्याच्या आजोबाने त्याला एक लेख वाचायला दिला. एका चौदा वर्षांच्या मुलीने स्वत:साठी कशी वेबसाइट बनवली याची माहिती त्या लेखात होती. त्या लेखातून प्रेरणा घेऊन चौथील शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या साहसने इंटरनेटवर सर्च करून वेबसाइट कशी बनवतात याचे धडे घेतले. गेल्या महिन्यातील ऑक्टोंबर महिन्यातील ही गोष्ट आहे. इंटरनेटवरील अवघ्या चार तासांच्या सर्चनंतर साहसने curiothoughts.com ही वेबसाइट बनवली. ज्या मुलांकडे क्रिएटिव्ह विचार आहेत आणि जी मुले आपल्या बुद्धीला आणखी तल्लख बनवू इच्छितात यांच्यासाठी ही वेबसाइट आहे. नवनव्या आयडिया शेअर करण्यासाठी आणि नवीन काही तरी शिकण्यासाठी या वेबसाइटचा उपयोग सध्या अनेक जण करत आहेत. आता आपल्या वयाच्या मुलांसाठी मोबाइल गेमचे एखादे अॅप डेव्हलप करण्याचा साहसचा विचार आहे. 
 
फंडा असा आहे की, स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा नवा ट्रेंड सध्या येत आहे. आपण कोणत्याही वयाचे असा, तुमची आयडिया इतरांसाठी प्रेरणा बनेल अशी कामे सध्या अनेक जण करताना दिसतात. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...