आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: मुलांच्या रस्त्याने चला, ते नक्कीच रस्त्यावर येतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोच कार्टर या २००५ मध्ये आलेल्या हॉलीवूड चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित होती. १९९९ मध्ये केन कार्टर याने कॅलिफोर्नियातील रिचमंड भागात कोणत्याही सुविधा नसणाऱ्या एका हायस्कूलमध्ये बास्केटबॉल कोच म्हणून नोकरी पत्करली. खराब प्रदर्शन आणि खराब वागणूक या दोन्हीमध्ये त्याला त्याच्या टीमला पुढे न्यायचे होते. त्याने आपल्या टीमसाठी कडक नियम बनवले. सगळ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्याला सन्मान द्यायला आणि खेळाचा ड्रेस कोड घालण्याचे सक्तीचे केले. सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र जे व्हायचे तेच झाले. त्याने आपल्या हायस्कूलची टीम नंबर एकवर नेली. खेळ तर सुधारला, मात्र अति आत्मविश्वासाने या विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. त्यांना ड्रग्जचे व्यसनही लागले. आता मात्र केनने ही बाब गांभीर्याने घेतली. त्याने खेळाच्या कोर्टाला कुलूप ठोकले. जोपर्यंत त्याच्या टीमचे खेळाडू सगळ्या विषयांत पास होत नाहीत तोपर्यंत खेळ बंद ठेवणार असल्याचे त्याने सांगितले. विद्यार्थ्यांना बास्केटबॉलवर एवढे प्रेम जडले होते की, खेळासाठी त्यांना मनापासून अभ्यास केला आणि सगळ्या विषयांत पास होऊन दाखवले. दोन तास १६ मिनिटांच्या या चित्रपटात कार्टरचा संघर्ष दाखवला आहे. टीनएजर्स विद्यार्थ्यांना वाईट सवयीमधून बाहेर आणणारा कार्टर प्रत्येक अडचणीवर मात करताना दाखवण्यात आला आहे. 
 
हावडा स्टेशनपासून नऊ किलोमीटर अंतरावरील ताराताल येथील हरिजन ज्ञान मंदिर ही एक साधारण शाळा आहे. या सरकारी शाळेत १७५ विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेकांचे पालक मोलमजुरी करत असल्याने त्यांना आपल्या पाल्याच्या शिक्षणात जास्त रस नाही. अनेक कुटुंबांतील पहिली पिढी शिक्षण घेत असल्याची स्थिती आहे. या शाळेतील उपस्थिती ६० ते ७० टक्के असते. शनिवारी शाळेत दुपारच्या जेवणात अंडे मिळत असल्याने त्या दिवशी जास्त उपस्थिती असते. आता मात्र हीच उपस्थिती १२० पेक्षाही जास्त झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. जानेवारी महिन्यात शाळेतील असिस्टंट टीचर राकेश तिवारी यांना पश्चिम बंगाल बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने ट्रेनिंग देण्यात आली. आपल्या शाळेत बास्केटबॉल शिकवण्यासाठी ही ट्रेनिंग होती. आता राकेश हे आपल्या विद्यार्थ्यांना बास्केटबॉल शिकवतात. हा बॉल या शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा पाहिल्याने त्यांना या खेळाविषयी आकर्षण वाढले. बेसिक्स, फुटवर्क, पासिंग, शूटिंग आणि खेळाचे काही नियम शिकवल्यावर विद्यार्थ्यांना या खेळाचे आकर्षण वाटू लागले आहे. 
 
या शाळेतील उपस्थिती वाढण्यासाठी एका निर्णयाने महत्त्वाची भूमिका निभावली. तो निर्णय होता शाळेतील खेळाच्या तासाचा. शाळेने रोज इतर विषयांचे तास झाल्यावर खेळाचा तास घेण्याचा निर्णय घेतला. आता शाळेची बेल झाल्यावर हे विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या केबिनकडे धाव घेतात. तेथे ठेवलेला बास्केटबाॅल घेऊन ते कोर्टाकडे धाव घेतात. तेथे मोडक्या-तोडक्या खांबाला लटकवलेल्या जाळीत हा बॉल घालण्याचा प्रयत्न करतात. शाळेतील कोच तिवारी किंवा या विद्यार्थ्यांना कोर्ट कोचरबद्दल किंवा त्या चित्रपटाबाबत काहीच माहिती नाही, मात्र या विद्यार्थ्यांची कथाही त्या चित्रपटासाखीच आहे. 
 
ही अगदी खरीखुरी कथा आहे, ज्यात खेळामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड लागली आहे. आता या एनबीएच्या अधिकाऱ्यांचे लक्षही या शाळेने खेचले आहे. 
 
फंडा असा आहे की: जर मुले तुम्ही सांगितलेल्या रस्त्याने जात नसतील तर तुम्ही मुलांच्या रस्त्यावर चला. ते तुमच्याशी एकरूप होतील आणि तुम्ही सांगितलेल्या रस्त्यावर चालतील. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...