आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: नवीन टेक्नॉलॉजीने वाढेल आपल्या मुलांची सुरक्षितता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टोरी 1 : पंचकुला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चार आणि सहा वर्षे वय असणाऱ्या दोन मुलांना रस्त्यावर फिरताना पाहिले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाव्यतिरिक्त काहीच माहिती दिली नाही. गावाचे नाव, पत्ता, फोन नंबर अशी कोणतीच माहिती ती मुले देऊ शकल्याने शेवटी त्यांना जवळील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. पोलिसांनी चंदिगड, हरियाणा, पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेशातील सगळ्या पोलिसांना या दोन मुलांची माहिती दिली, मात्र हाती काहीच लागत नव्हते. 
पोलिस रोज या मुलांची भेट घ्यायचे. शेवटी त्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला त्याच्या आजोबाचे नाव आणि त्यांचे बिहारमधील गाव आठवले. पोलिस या मुलांना चंदिगड सेक्टर १७ मधील आधार कार्ड सेंटरवर नेले. तेथे त्याच्या आजोबाच्या नावाच्या सगळ्या व्यक्तींचे फोटो दाखवले. त्या दोघांनीही त्यांच्या आजोबांना आेळखले. त्यानंतर बिहार पोलिसांनी स्थानिक पोलिसांकडे चौकशी केली. त्या मुलांच्या आजोबांनी ही दोन्ही मुले त्यांचे नातू अाहेत आणि त्यांचे आईवडील नेपाळमध्ये आहेत, असे सांगितले. बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोन्ही मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले. मात्र, एक प्रश्न अनुत्तरितच राहिला, तो म्हणजे नेपाळवरून ही मुले पंचकुलापर्यंत आली कशी? पोलिसांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते मिळाले नाही. आपली मुले घरासमोरच खेळत होती आणि तेथूनच ती गायब झाली, एवढेच उत्तर त्या मुलांचे पालक देत होते. 
 
स्टोरी 2 : संजय नागनाथ येंकुर या मुलाला बोलता आणि ऐकता येत नाही. तो अनाथ आहे. २०१४ मध्ये आपल्या मोठ्या भावाबरोबर भांडण झाल्यानंतर संजयने लातूर जिल्ह्यातील आपले हिंचाड हे गाव सोडले. तब्बल ८०० किलोमीटरची यात्रा करून तो गुजरातमध्ये पोहोचला. संजयने आपल्या आईवडिलांना २०११ मध्ये गमावले होते आणि सध्या तो हिंचाडमध्ये आपली मामी संगमाबेन माणिकराव गांटे हिच्याकडे राहत होता. 
गेल्या वर्षी २२ मार्चला गुजरात पोलीसांना वडोदरा रेल्वे स्टेशनवर संजय फिरताना दिसला. त्या वेळी तो ११ वर्षांचा होता. त्याला ऐकता आणि बोलता येत नसल्याने पोलिसांना कोणतीच माहिती मिळवता आली नाही. शेवटी त्याला बाल सुरक्षा आयोगाकडे सोपवण्यात आले. बाल सुरक्षा अायोगाने या संजयला नर्मदा जिल्ह्यातील राजपीपला येथील सरकारी मूक-बधीर शाळेत टाकले. त्या शाळेत त्याला आकाश नाव मिळाले. तो इयत्ता दुसरीत जाऊ लागला. यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये त्यांच्या शाळेत आधार कॅम्प लावण्यात आला. सगळ्या मुलांचे आधार कार्ड काढले गेले, मात्र संजयचा आयडी तयार होत नव्हता. संगणकाने संजयचे फिंगरप्रिट स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याचे आधार कार्ड तयार होत नव्हते. पोलिसांनी जास्त चौकशी केल्यावर हे फिंगरप्रिंट यापूर्वीच सेव्ह केलेले आहेत आणि त्या व्यक्तीचे नाव संजय नागनाथ येंकूर आहे, असे पोलिसांना समजले. लातूर जिल्ह्यातील त्याच्या गावी संपर्क केला असता संजयचा पत्ता सापडला. 
 
स्टोरी 3: १४ वर्षांचा लवप्रीत सिंग दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता. गेल्या महिन्यात तो सापडला. त्याच्या सापडण्याचे कारणही आधार कार्ड होते. लवप्रीत हिमाचल प्रदेशला गेला होता आणि तेथील सरकारी कर्मचाऱ्यांना तो सापडला. तेथून त्याला पंजाबला आणण्यात आले. गुरुदासपूरच्या प्रशासनाने जेव्हा त्याचे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची फिंगरप्रिंट यापूर्वीच आधार सिस्टिमला सेव्ह असल्याचे समजले. त्यावरून त्याचे नाव आणि पत्ता मिळाला. भटिंडा या गावी त्याला आपल्या पालकाकडे सोडण्यात आले आहे. 
अमेरिकेसारख्या देशाचे पोलिस हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या युनिक आयडेंटिफिकेशनवरून शोधून काढतात. आता तामिळनाडू सरकारनेही नवजात बालकांचेही आधार कार्ड काढण्याची सक्ती केली आहे. यामुळे अनेक लाेकांचे पत्ते सापडू शकतात.

फंडा असा आहे की, आधार सारख्या नव्या टेक्नॉलॉजिमुळे आता आपल्या मुलांची सुरक्षा जास्त वाढली अाहे. अशा नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर व्हायलाच हवा. 
 
 
raghu@dbcorp.in

मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 या मोबाइल क्रमांकावर. 
बातम्या आणखी आहेत...