आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: आवडत्या रस्त्याने गेले तर यश नक्कीच मिळते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजेश कृष्णननेकेरळ युनिव्हर्सिटीतून बायो टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर इकॉनॉमी मास्टरची पदवी घेण्यासाठी ते पुद्दुचेरीला गेले. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना डॉक्टरेटचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर राजेश यांनी ग्रीनपीस या संस्थेत जॉब करण्यास सुरुवात केली. तेथील एक तपापेक्षाही जास्त नोकरीत त्यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम केले. जीएम शेतीच्या ते विरोधात होते. राजेश आजही जीएम शेतीविरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होतात.

जीएम-फ्री इंडिया या उपक्रमाचे ते सहसंयोजकही आहेत. ही संस्था देशभरातील ४०० संघटनांचे प्रतिनिधित्व करते. ग्रानपीसमध्ये १० वर्षे काम करताना त्यांची भेट महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकरी नेता विजय जवांधिया यांच्याशी झाली. एक व्यक्ती संपूर्ण समाज बदलू शकते, अशी विजय यांची भूमिका त्यांना खूप भावली. भारतात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना विदर्भातील विजय यांच्या गावातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. राजकारणाच्या माध्यमातून विजय जवांधिया हे सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या सगळ्या सरकारी योजना आपल्या गावापर्यंत घेऊन येतात.

जे बँक अधिकारी मुजोर आहेत त्यांना योग्य समज देऊन प्रसंगी आंदोलन करून सगळ्या योजनांचा लाभ आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन येतात. आज बायोटेक्नॉलॉजिस्ट असलेले राजेश आपल्या घरी परत अाले आहेत. केरळमधील वायनाडजवळील थ्रिसिलेरी या आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ग्रीनपीसच्या नोकरीचा राजीनामा देऊन राजेश यांनी संपूर्ण वेळ गावात थांबण्याचे ठरवले आहे. २००८ मध्ये आपल्या भावाला सोबत घेऊन राजेश यांनी आपल्या गावी साडेपाच एकर जमीन घेतली.
 
नोकरीत असताना जैविक शेतीबद्दल अनेक पुरस्कार मिळवलेले ३८ वर्षीय राजेश सध्या विजय यांनी विदर्भात केलेले काम आपल्या गावी करत आहे. राजेशने नुकतेच अन्य १० शेतकऱ्यांना सोबत घेऊन थिरुनेली अॅग्री प्रोड्युर्स कंपनी स्थापन केली. नाबार्डकडून त्यासाठी मदत घेतली असून राजेश स्वत: या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम पाहतो आहे. राजेशचे वाखाणण्याजोगे काम हे आहे की तो मूळ बियांना पुनरुज्जीवित करण्याचे काम करतो आहे. स्थानिक वातावरणाशी लढणाऱ्या चांगल्या प्रतीच्या देशी वाणांना तो नव्या पद्धतीने संकरित करताे आहे. असे म्हणतात की आपल्या देशात तांदळाचे तीन हजारांहून अधिक प्रकार होते. सध्या त्यातल्या फक्त ३०० जातीच शिल्लक आहेत. आपल्या शेतात त्याने ४० विविध प्रकारच्या वाणांचा प्रयोग केला आहे. याशिवाय केळी, काळी मिरची, भाजीपाला आणि रबराच्या शेतीकडेही राजेशने लक्ष केंद्रित केले आहे.
 
राजेशच्या यशानंतर त्याच्या गावातील अनेक शेतकरी ऑर्गेनिक शेतीकडे वळले. एकमेकांकडून नवनवीन बियांचे प्रयोग शिकून या गावातील शेतकरी सध्या शेती करत आहेत. यापूर्वी मोठ्या शहरात काम केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी चांगली बाजारपेठ कोणती आणि ती कशी मिळवायची हे राजेशला माहीत आहे. सध्या ऑर्गेनिक बाजार चांगलाच पाय पसरू लागला आहे. अशा वेळी त्यांच्या शेतातील मालाला चांगलीच किंमत मिळत आहे. एवढेच नाही तर पीक येण्यापूर्वीच त्यांनी आपला मालही विकला आहे. राजेशच्या फेसबुक पेजवर तो असे म्हणतो की गावातून शहरात गेलेला आणि पुन्हा गावात आलेल्या अख्ख्या गावातील तो पहिलाच मनुष्य आहे. आपले आयुष्य कसे जगायचे आणि शेतीच्या माध्यमातून पुढे कसे जायचे हे राजेश यांना चांगले माहीत आहे.
 
फंडा असा आहे की : आपण आपल्या ध्येयाबाबत स्पष्ट असले पाहिजे. आपल्याला जे आवडते त्यात रस्त्याने गेले तर यश नक्कीच मिळते.
 
raghu@dbcorp.in
 
मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर
 
बातम्या आणखी आहेत...