आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: तंत्रज्ञान हे भविष्यातील पोलिस, मित्र मार्गदर्शकही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टोरी 1 - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) कर चोरी करणाऱ्यांना पकडण्यात प्राप्तिकर विभागाची मदत करते, असे कुणी सांगितले तर त्यावर विश्वास ठेवा. एका प्राप्तिकर दात्याने आपली शेतजमीन विकून आलेल्या रकमेवर सवलत मिळण्याचा दावा केला. प्राप्तिकर कायद्यानुसार, विक्री करण्यापूर्वी कमीत कमी दोन वर्षे अशा जमिनीचा वापर शेतीसाठी झालेला असेल तरच ही सवलत मिळते. चुकीच्या माहितीवर शंका घेत गुजरातच्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी इस्रोशी संपर्क केला आणि मागील तीन वर्षांतील संबंधित जमिनीची उपग्रह छायाचित्रे मागवली. इस्रोच्या शास्त्रीय माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने ही जमीन पडीक होती पिके घेण्यासाठी तिचा वापर झालेला नाही, हे सिद्ध केले. अशा प्रकारे प्राप्तिकर दात्याचा दावा फेटाळण्यात आला त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. करप्रणालीतून कुणीही सुटू नये, हा प्राप्तिकर विभागाचा नवा मंत्र आहे. त्यासाठी हा विभाग आपल्या अधिकारकक्षेतील सर्व यंत्रणांची मदत तर घेतच आहे, त्याशिवाय इस्रो, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, सेबी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सर्व बँका, कंपनी रजिस्ट्रार, भू रजिस्ट्रार इत्यादींची मदत घेत आहे. 
 
स्टोरी २- बालविवाहांचे प्रमाण बिहारमध्ये सर्वाधिक आहे. या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी २७० एनजीओ संघटनांच्या ‘जेंडर अलायन्स’ या महासंघाने रविवारी पाटण्यात ‘बंधन तोड’ नावाच्या अँड्रॉइड अॅपचे उद्घाटन केले. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या निधीच्या उपक्रमातून विकसित झालेल्या या अॅपद्वारे बालविवाह किंवा हुंडा घेणाऱ्यांबद्दल माहिती देता येते. यात ‘सेन्सर ऑब्झर्व्हेशन सर्व्हिस’ (एसओएस) फीचर असेल. याद्वारे तत्काळ संबंधित इमर्जन्सी नंबरवर संदेश पाठवला जाईल. संकटातील व्यक्तीला दोन तासांत मदत मिळेल. पीडित व्यक्ती किंवा मित्राकडून एसओएस पाठवला गेल्यास नोंदणीकृत मोबाइल नंबर इतर माहिती जेंडर अलायन्स मॉनिटरिंग सेल आणि स्थानिक संस्थांना पाठवली जाईल. 
 
स्टोरी 3 - राऊरकेला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी गौरव पटनायक आणि अभिषेक अग्रवाल यांनी शिक्षण पद्धतीतील ‘लेक्चर’च्याही पुढे जाऊन ‘लर्निंग’ प्रणाली विकसित करण्याचे ठरवले. जीएजी अर्थात (www.justaskgaurav.com) या वेबसाइटवर डीप लर्निंग कंटेंट आणि टेक्निक विकसित करण्यात आली आहे. जगभरातील उच्च बिझनेस स्कूलकडून प्रेरणा घेत त्यांनी हा उपक्रम राबवला. या पद्धतीने शिक्षण झालेले विद्यार्थी सखोल ज्ञानप्राप्तीच्या मार्गानेच जातात, यावर त्यांचा विश्वास आहे. ही वेबसाइट ११२ देशांच्या १३२ बिझनेस स्कूलमध्ये ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोग्रामसाठी घेण्यात येणाऱ्या जीआय आणि जीमॅटसारख्या परीक्षांसाठी क्लासरूम टीचिंग उपलब्ध करून देत आहे. तसेच लॉ स्कूल अॅडमिशन टेस्ट, टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरेन लँग्वेज आणि इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टिमसाठीही ही वेबसाइट मदत करत आहे. याद्वारे अनेक विद्यार्थी जागतिक प्रतिष्ठेच्या विद्यापीठात प्रवेशही मिळवत आहेत. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...