आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: निर्णयाचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत गेल्या शुक्रवारी एलफिन्सटन रोडवर घडलेली दुर्घटना गंभीर होती. त्यात २२ लोक मृत्यू पावले. कधी ना कधी हे होणारच होते. या दुर्घटनेमागे अनेक कारणे आहेत. या घटनेला मी एका मोठ्या निर्णयाचा परिणाम मानतो. ते कसे यासाठी एक उदाहरण देतो. प्रत्येकाला माहीत आहे की हनोई व्हिएतनामची राजधानी आहे. १८९७ मध्ये पाल डूमर हनोईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आले. फ्रान्सला साजेसे शहर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या शतकाच्या सुरुवातीलाच हनोईत अनेक अधिकारी राहायला आले होते. अनेक बंगले बांधले गेले होते. फ्रेंचमधील हनोईला नवीन लूक देण्यासाठी हा काळ सर्वात चांगला असल्याचे डूमरने हेरले. ड्रेनेजचा एक मोठा नाला आणि त्याच्याशेजारीच एक छोटा नाला व्हिएतनामच्या जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रातून जात होता. हा नाला स्वच्छतेचे प्रतीक होते. त्यातून जर उंदीर बाहेर येऊ लागले तर काय होईल, अशी नुसती कल्पना करा. या नाल्याखाली डूमरने नऊ मैला लांब सीव्हेज लाइन टाकली. ही लाइनच उंदरांसाठी स्वर्ग ठरली. तेथे अनेक उंदीर खेळू लागले. संपूर्ण शहरातून ही लाइन जात असल्याने या उंदरांना जेव्हा भूक लागायची तेव्हा ते उंदीर शहरातील सगळ्यात उच्चभ्रू वस्तीत पोहोचायचे आणि तेथील नागरिकांना त्रास द्यायचे. 
 
या त्रासाने कंटाळलेल्या डूमरने व्हिएतनामच्या नागरिकांना उंदरांची शिकार करण्याची परवानगी दिली. मारलेले उंदीर दाखवून रोख पारितोषिक देण्यात येऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की या ड्रेनेजलाइनमध्ये उतरून अनेकजण रोज हजारो उंदरांची शिकार करू लागले. एखाद्या दिवशी तर चक्क २० हजार उंदीर मारण्यात येत होते. एवढे सगळे होऊनही उंदीर कमी होत नव्हते. या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यावर असे समजले की, या शहराशेजारच्या खेड्यांमध्ये उंदरांचे बीजारोपण करण्याचा उद्योग काहींनी सुरू केला होता. उंदीर जन्माला घालायचे आणि पैशाच्या लालसेपोटी तेच परत मारून सरकार दरबारी जमा करण्याचा नवा व्यवसाय सुरू झाला होता. त्यानंतर उंदीर मारल्यानंतर देण्यात येणारे रोख बक्षीस बंद करण्यात आले. 
 
गेल्या शुक्रवारी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तो एलफिन्सटन स्टेशन आणि लोअर परेलला जोडणारा पूल गेली अनेक दशके कापड कारखान्यांनी वेढलेला होता. अनेक मिल वर्कर कारखान्याच्या आसपास राहात असल्याने या पुलाला गेल्या अनेक वर्षांपासून वर्दळीची सवय होती. या ठिकाणी जेवढे कारखाने होते त्यांच्या मालकांना या परिसरातील जमीन शहरातील लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बहाल करण्यात आली होती. १९८२ ला जेव्हा मिल कामगारांनी संप केला तेव्हा निर्माण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी शहर विकासकांना हाताशी धरून ही जमीन शहरीकरणासाठी वापरण्यास राजी केले. एफएसआय वाढवून ही जमीन विकासासाठी खुली करण्यात आली. एकाच निर्णयानंतर सुमारे ९०० एकर जमीन विकासासाठी खुली झाली. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करता तेव्हा तो चालवण्यासाठी तुम्हाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते. जेव्हा तुम्ही ग्रीज बिझनेस (फॅक्टरी) ऐवजी पॉश बिझनेस (ऑफिस) सुरू करता तेव्हा तुमचे सगळे कर्मचारी एकाच वेळी येतात आणि जातातही. मुंबई ही मुळात रेल्वेवर अवलंबून असल्याने जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा प्रवाशांची संख्या हजार नाही तर लाखांच्या घरात होती. या अपघातात लोकांना दोष देऊन काहीच उपयोग नाही कारण जेव्हा पाऊस येतो तेव्हा लोक आडोशाचाच आसरा घेतात. आडोसा शोधतानाच हा अपघात घडला. 
 
फंडा असा आहे की... 
प्रत्येक निर्णयामागे अनेक परिणाम असतात. त्यामुळेच कोणताही निर्णय घेताना त्याखाली सही करणारा या सगळ्या भविष्यातील परिणामांचा विचार करतच असतो. 
 
 
raghu@dbcorp.in

एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 
 
बातम्या आणखी आहेत...