आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: वडील हेच आपल्या मुलांचे खरे हीरो असतात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मुलांना एका सुंदर जगाची सैर करायची असली तर आणि त्यांना काही तरी नवीन दाखवायचे असेल तर दिल्लीच्या शंकर्स इंटरनॅशनल डॉल सेंटर म्युझियमची यात्रा एकेकाळी केली जायची. या संग्रहालयात ६० हजारांपेक्षा जास्त डॉल आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या संग्रहालयांपैकी ते एक आहे. हे संग्रहालय पाहिल्यावर मन आपोआप तरुण होते आणि एका नव्या जगाची सैर केल्याचा आनंद आपल्याला मिळतो. 
 
राजकोटच्या दीपक अग्रवाल यानेही २००० मध्ये आपल्या मुलीसाठी असेच संग्रहालय तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा त्याची पत्नी मीनाक्षी हे आपल्या दोन्ही मुलींना घेऊन चारधाम यात्रेसाठी गेले होते. केदारनाथला गेल्यावर मंदिर खूप उंच असल्याने त्यांची सहा वर्षांची मुलगी काजलने पायी चालण्यास नकार दिला. त्यांनी समजावून सांगितले, मात्र ती डोंगर चढण्यास तयार होत नव्हती. अखेर दीपक यांनी, ‘यात्रा संपल्यानंतर तुला दिल्लीला जगातील सगळ्यात मोठे डॉल म्युझियम दाखवायला नेईन,’ असे आश्वासन तिला दिले. त्यानंतर ती चढण्यास तयार झाली. त्यानंतर घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी काजलला घेऊन दीपक राजकोटवरून दिल्लीला गेले. सोमवारी हे म्युझियम बंद असते हे त्यांना माहीत नव्हते. तेथे गेल्यावर ते समजले. त्यानंतर काजोल आणि दीपक दोघेही खूप नाराज झाले. 

काय करावे हे त्यांना समजत नव्हते, कारण सोमवारी संध्याकाळीच त्यांनी परतीचे तिकीट बुक केलेले होते. शेवटी ‘आपल्या घरीच आपण डॉलचे मोठे म्युझियम तयार करू’ असे आणखी एक आश्वासन त्यांनी काजलला दिले आणि हे पिता-पुत्री राजकाेटला परत आले. येथे आल्यावर आठवडा उलटला. अग्रवाल कुटुंबाचा दिनक्रम पूर्ववत सुरू होता. सकाळी सुरू झालेला दिवस रात्री मुलींना गोष्टी सांगून संपत होता. एक दिवस काजलने वडिलांना डॉल म्युझियमच्या आश्वासनाची आठवण करून दिली. दीपक तिच्या बोलण्याने क्षणभर चमकले. कारण काजल हे सगळे विसरली असेल, असे त्यांना वाटले, मात्र आता मुलीचा हट्ट पूर्ण करायचा हे त्यांनी मनाशी पक्के केले. 
 
दीपक रोटरी क्लबचे सदस्य होते. हा क्लब जगभर पसरला आहे. या क्लबच्या माध्यमातून काही हाती लागेल का, याची चाचपणी त्यांनी सुरू केली. पहिल्यांदा क्लबच्या १२ सदस्यांना पत्र पाठवून त्यांनी आपल्या प्रोजेक्टची माहिती दिली आणि कुणाला काही मदत करता येईल का, याची विचारणा केली. आपल्या भावना, समर्पण आणि विश्वास हे सगळे त्यांनी त्या पत्रात नमूद केले होते. १२ पैकी फक्त तीन जणांनी त्यांच्या पत्राला उत्तर दिले. दीपक नाराज झाले, मात्र कुणाला काहीही माहिती नसताना ३३ टक्के जणांनी तुला उत्तर पाठवले याचा अर्थ तू यशस्वी झालास, असे त्याच्या मित्रांनी त्याला समजावले. व्यावसायिक भाषेत ३३ टक्के यश खूप मोठे असते हे त्या मित्राने दीपकला समजावले. त्यानंतर मात्र दीपकने जगातील १०८ देशांतील रोटरियन्सला असे पत्र पाठवले. अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि बघता बघता जगभरातून राजकोटला डॉल येऊ लागल्या. 
 
शेतकरी, नृत्यांगना, राजा, राणी, कॅसोनोवा, व्हायोलिन वादक, परी अशा अनेक आकाराच्या डॉल येत होत्या. काहीच दिवसांत जवळपास ८०० डॉल जमा झाल्या. त्या ठेवण्यासाठी दीपकचे आणि त्याच्या शेजाऱ्याचे घरही कमी पडू लागले. शेवटी राजकोट नागरी सहकारी बँकेच्या मालकीच्या शहराच्या मध्यवर्ती जागेचा दुसरा मजला एक रुपया महिना भाडे घेऊन ताब्यात घेण्यात आला. अशा प्रकारे भारतातल्या दुसऱ्या ‘द रोटरी डॉल्स म्युझियम’ने आकार घेतला. २००४ मध्ये उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी त्याचे उद््घाटन केले. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या म्युझियमची नोंद करण्यात आली होती. आज या म्युझियमला भेट देणे प्रत्येक बापाची इच्छा असते. 
 
फंडा असा आहे की... 
वडील जेव्हा आपल्या मुलांसाठी एखाद्या हीरोसारखे काम करतात तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो. 
 
मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...