आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: प्रसंग कसाही असो, स्वप्न जिवंत ठेवायला हवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही मणिपूरच्या थौलाब जिल्ह्यातील हाआेखा ममांग या कधीही नाव ऐकलेल्या गावातील कथा आहे. २०१० मध्ये जॅक्सन सिंग पाचव्या इयत्तेत शिकत होता. त्या वेळी फुटबॉल या खेळाच्या त्याच्यावर एवढा प्रभाव पडला की फुटबॉल खेळण्यासाठी तो अक्षरश: झपाटला होता. आताच्या मुलांवर ब्लू व्हेलचा जेवढा प्रभाव पडतो त्यापेक्षा जास्त प्रभाव जॅक्सनवर पडला होता. त्याचा मोठा भाऊ जेनिचंद सिंग आणि चुलत भाऊ अमरजित सिंग हेसुद्धा फुटबॉल खेळत होते. एकाच कुटुंबात तीन जण फुटबॉलच्या खेळाने झपाटलेले होते. जॅक्सनचे वडील कोथौजाम दबेन सिंग यांनी या तिघांचे फुटबॉलवरील प्रेम पाहिले आणि स्वत: त्यांचे कोच बनले. 
 
पाच वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये एआयएफएफ अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी अमरजितची निवड झाली. जॅक्सनसाठी हे वर्ष काही खास नव्हते. त्याचा भाऊ कोलकाता प्रीमियर लीगच्या पिअरलेस क्लबमध्ये गेला आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांनी डावलल्याने जॅक्सन मात्र चंदिगडमध्येच आपले दु:ख लपवत बसला. आपली योग्य वेळ येईल हे जॅक्सनला माहीत होते. त्याचदरम्यान वडिलांना लकवा झाल्याने त्यांना मणिपूर पोलिसमधील आपली नोकरी सोडावी लागली. क्लब फुटबॉल खेळून मिळणाऱ्या भावाच्या पैशावर घर चालवणे कठीण होते. तो पैसा त्यालाच पुरत नव्हता. अखेर पैसे कमावण्यासाठी जॅक्सनची आई आणि चुलती रोज घरापासून २५ किलोमीटर अंतरावरील इन्फाळच्या ख्वैराम्बंद बाजारात भाजीपाला विकण्याचे काम करू लागल्या. जॅक्सन हा सहा फुट दोन इंच उंचीचा तगडा तरुण होता. त्याच्याकडे पाहून हा गरीब कुटुंबातून आला असेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. 
 
जॅक्सनचा वैयक्तिक संघर्ष सुरूच होता. फुटबॉलवरील त्याचे प्रेम मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. आयुष्याचा पुढचा टप्पा म्हणून तो चंदिगड येथील मिनर्वा अकॅडमी जॉइन केली. तेथे राष्ट्रीय अंडर-१६, अंडर-१६ या दोन स्पर्धामध्ये त्याने आपल्या टीमचे नेतृत्व केले. सलग दोन्ही स्पर्धा जिंकल्याने मिनर्वा टीमला या वर्षी गोव्यात झालेल्या इंडिया अंडर-१७ स्पर्धेत खेळण्याचे आमंत्रण मिळाले. तेथेही त्याच्या टीमने १-० ने विजय मिळवला. इंडिया अंडर-१७ चे हेडकोच असलेल्या लुईस नॉर्टोन मॅटोस यांनी जॅक्सनचा खेळ पाहिला आणि ते प्रभावित झाले. भारतीय टीमच्या २१ सदस्यांपैकी मॅटोस यांनी निवडलेल्या चार खेळाडूंपैकी जॅक्सन एक होता. जॅकसन या टीममध्ये डिफेन्सिव्ह मिडफील्डर म्हणून घेतला गेला. भारतीय टीममधील सगळ्यात उंच आणि वयापेक्षा दुप्पट परिपक्त खेळाडू म्हणून सध्या जॅक्सनची आेळख आहे. कदाचित आयुष्यात केलेल्या संघर्षामुळेच तो एवढा परिपक्त झाला असावा. भारतीय संघातील खेळाडूंपैकी आठ खेळाडू हे एकट्या मणिपूर राज्यातील आहेत. मणिपूरला याचा अभिमान नक्कीच असेल. 

भारतील फुटबाॅल संघातील अनेक खेळाडूंची कौटुंबिक पार्श्वभूमी जॅक्सनसारखीच आहे. संजीव स्टॅलिनची आई बंगळुरूच्या फुटपाथवर कपडे विकते. आईने कोठून पैसे आणून त्याला फुटबॉलसाठी बूट घेऊन दिले हे अजूनही संजीवला समजलेले नाही. जितेंद्र सिंगचे वडील बंगालमध्ये वॉचमन आहेत. डिफेंडर अन्वर अली तर गुरे चारायला जात होता. स्टायकर अनिकेत जाधव हा कोल्हापूरचा अाहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंडर-१७ चा दिल्लीत होणारा वर्डकप पाहण्यासाठी संपूर्ण जाधव कुटुंब कोल्हापूरवरून दिल्लीला जाणार अाहे. 
 
‘इंडिया अंडर-१७’च्या संघातील अनेक खेळाडू खूप संघर्ष करून आलेले आहेत. आपल्या कुटुंबीयांना दिल्लीत इतिहास घडवून दाखवू की नाही याची खात्री त्यांना नसली तरी आपल्या परिस्थितीवर मात करायची असेल तर आपल्याला सर्वोत्तम खेळायला हवे हे त्यांना माहीत आहे. जर या मुलांनी या वर्डकपमध्ये चांगली कामगिरी केली तर अनेक क्लब एक लाख २० हजार रुपये महिना मानधन देऊन त्यांना आपल्या क्लबमध्ये खेळण्याची ऑफर देतील. आपल्या कुटुंबीयांच्या अपेक्षांसाठी त्यांना चांगले खेळावेच लागेल. 
 
फंडा असा आहे की 
विजयानंतरच्याहास्यासाठी आपल्या हृदयातील स्वप्ने आपण जिवंत ठेवायला हवीत. समस्यांचे तुफान पूर्ण शांत होत नाही तोपर्यंत स्वप्नांचा पाठलाग करायला हवा. 
 
raghu@dbcorp.in
 
 
मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 
 
बातम्या आणखी आहेत...