आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅनेजमेंट फंडा: ग्राहकांना जवळून आेळखले तर व्यवसायात प्रगती साधते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या स्कँडलची आठवण येईल किंवा अश्लील वाटेल असे हे वाक्य असले तरी ते मार्केटिंगची प्रख्यात स्लोगन म्हणून आेळखले जाते. ‘ग्राहकांबरोबर झोपा’ हे वाक्य विचित्र वाटत असले तरी ग्राहकांना जे लागेल ते द्या असाच त्याचा अर्थ आहे. 
 
स्टोरी 1: हेचफ्लोचॅटचा संस्थापक आणि सीईआे असलेल्या प्रतीक लाल याने केले. तो ज्यांना आेळखत होता ते सगळे मित्र एकसारखेच अॅप वापरत होते. यू-ट्यूब, आेला, बिंझ, उबर, जोमेटो, बुक माय शो, कुपन दुनिया इत्यादी. मुंबईत स्टार्टअपने २०१६ मध्ये लाँच केलेले फ्लोचॅट हे असे फ्री हायब्रीड मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे जे एकाच फ्रेममध्ये सगळे अॅप आेपन करतो. यात युजर सिनेमाला जाण्यासाठी टॅक्सी बुक करू शकतो. टॅक्सीत बसल्यास सिनेमाचे तिकीट बुक करू शकतो. सिनेमा पाहताना जेवणही बुक करू शकतो आणि त्याच विंडोत हे सगळे करताना तो चॅटिंगही करू शकतो. हे एकच अॅप असेल तर बाकीच्या कशाचीही गरज नाही. पाठवलेले मेसेज आपण एडिटही करू शकतो. फ्लोचॅटमधून मॅसेज पाठवायला इतर अॅपप्रमाणे यालाही फोन नंबरची आवश्यकता नसते. आपण फक्त नाव सर्च करून मेसेज पाठवू शकतो. हे अॅप तरुणांना आवडू लागले आहे आणि पेटीएम, फ्लिपकार्डसारख्या कंपन्याही या अॅपमध्ये रुची दाखवू लागल्या आहेत. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीने पाच लाख कस्टमर आणि १० लाख डॉलरची गुंतवणूक पूर्ण केली अाहे. 
 
स्टोरी 2: जास्त काम असल्याने बंगळुरूतील अनेक व्यक्तींचे तासन््तास कारमध्ये जातात. आयटी क्षेत्रातील गरज पाहत मोक्ष श्रीवास्तव आणि प्रणय श्रीवास्तव यांनी ‘व्हीलस्ट्रीट’ नावाने दुचाकी भाड्याने देण्याची सेवा सुरू केली. ही सेवा यापूर्वीही होती, मात्र या दोघांनी ही सेवा ऑनलाइन सुरू करत तिला नवीन आेळख दिली. सगळे व्हेंडर एकाच प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी जोडले. कुणी कोठूनही अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर गाडी भाड्याने घेऊ शकतो आणि हवे तेथे तिला सोडूही शकतो. बंगळुरूसारखी ट्रॅफिकची समस्या अनेक शहरांत असल्याने त्यांनी सुरुवातीला ३० शहरांत ही सेवा सुरू केली. सध्या कंपनीकडे ३०० व्हेंडर आहेत आणि येत्या काही दिवसांत ६००० व्हेंडर करण्याची योजना आहे. भाड्यामध्ये २० टक्के नफा कमावून कंपनीचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीने चार लाख डॉलरचा (२.६० कोटींचा) बिझनेस केला. २०१७ मध्ये गेल्या नऊ महिन्यांत त्यांच्या कंपनीने ७० हजार ग्राहकांना सेवा दिली आणि गेल्या काही दिवसांत त्यांचे रोजचे ग्राहक १० हजार आहेत. रोज सेवा घेणारे आणि आठवड्याला सेवा घेणारे अशा दोन वर्गांवर त्यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी नवीन असूनही चार वेळा कंपनीने कोटींचा टप्पा पार केला. 
 
स्टोरी 3: स्कूल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रयत्नशील असतानाच घरातही मुलांचे वातावरणही फ्री राहावे यासाठी पालकांना सजग होताना त्रास होताना दिसतो. मुले घरी असताना किंवा मोबाइल इंटरनेटवर काय सर्च करतात हा प्रश्न त्यांना सतावत असतो. ब्लू व्हेलसारख्या गेममुळे मुलांना सुरक्षित ब्राउजिंग करता यावे, हा त्यांच्यासमाेरचा यक्षप्रश्न होता. आता बंगळुरूची एक टेक्नॉलॉजी कंपनी इनोव्हेटिव्ह राऊटर, अॅप आणि डिव्हाइस घेऊन येत आहे, ज्याने मुले काय ब्राउज करतात याची माहिती पालकांना होईल. ‘नेटगिअर’ पालकांना मुलांनी काय-काय ब्राउज केले हे सांगायला मदत करेल. 
 
फंडा असा आहे की... 
‘ग्राहकांबरोबर झोपा’ या स्लोगनचा बिझनेस जगतातला अर्थ समजला तर तुम्ही नक्कीच प्रगतिशील व्यवसाय करू शकता. 
 
raghu@dbcorp.in
 
 
मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर 
 
 
बातम्या आणखी आहेत...