आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: ‘देशी’ व्यक्तीही करू शकते परदेशात व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती सन मायक्राेसिस्टिम्सची जावा सर्टिफाइड प्राेग्रामर अाणि अमेरिकेतीलवाॅलस्ट्रीटमधील व्हाइटहाॅल बँकेत सहायक उपाध्यक्ष हाेती. तिच्या पतीने करिअरमध्ये प्राेग्रामर अॅनालिस्टपासून मॅनेजिंग कन्सल्टंटपर्यंत विविध भूमिका पार पाडल्या हाेत्या. यादरम्यान त्यांनी फायनान्शियल अकाउंटिंग साॅफ्टवेअर, लॅबाेरेटरी इन्फर्मेशन सिस्टिम साॅफ्टवेअर स्थापित केले हाेते अाणि बिझनेस डेव्हलपमेंट, प्राेजेक्ट मॅनेजमेंट अाणि ग्लाेबल टीमशी संपर्काची जबाबदारीदेखील सांभाळली हाेती. इतक्या उच्च पदावर अाणि वेतन-भत्ते मिळत असतानाही दीपक अग्रवाल अाणि साधना बाेथरा यांच्या लक्षात अाले की, अमेरिकेत एकट्या व्यक्तीच्या वेतनावर उपजीविका चालवणे साेपे नाही. जेव्हा त्यांच्या हे लक्षात अाले तेव्हा साधना यांनी मातृत्वाचा अानंद घेण्याचे ठरवले अाणि पहिल्या मुलासाेबत दीर्घकाळ राहण्याचे ठरवले. ही बाब २००४ पूर्वीची अाहे. अाता पुढे काय करायचे याचा विचार करता त्यांना एक कल्पना सुचली. 

अापल्यासारखेच ३० लाखांहून अधिक भारतीयांना हव्या त्या बाबी उपलब्ध करून देणारे असे पाेर्टल नाही. भारतीय संकेतस्थळावरून जर एखादी वस्तू खरेदी केली तरी ती पाेहाेचण्यासाठी बराच काळ लागत हाेता. त्या वस्तू परत पाठवायची माेठी अडचणच हाेती. विशेष म्हणजे या वस्तूंना इंग्रजी शब्द सापडणे त्याहून कठीण ठरायचे. कैक लाेकांना अाताही भारतीय किराणा दुकान शाेधण्यासाठी किमान तासभर ड्रायव्हिंग करावी लागते. बाजारातील या उणिवेचा विचार करता २००४ मध्ये साधना यांनी ‘देशी वस्त्र’ ही वेबसाइट सुरू केली, जी अमेरिकेतील मुलांसाठी भारतीय वस्त्रे विकत असे. दीपकने वेंडर रिलेशनशिप, टेक्नाॅलाॅजी, फायनान्स अाणि मार्केटिंगसारख्या बाबी सांभाळल्या तर साधना यांनी अॉर्डर पूर्ण करीत ग्राहकांशी समन्वय राखला. २००८ पर्यंत काही स्पर्धा नव्हती अाणि पुन्हा जगभर मंदीची लाट अाली. स्पर्धक तयार झाले. मात्र त्यांनी संघर्ष साेडला नाही. त्यांनी साऱ्या स्पर्धकांना ‘indiabazzar.com’च्या व्यासपीठावर एकत्र अाणले. कारण तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते इतरांच्या तुलनेत बरेच पुढे हाेते. बाहेरून काेणत्याही प्रकारची मदत घेता या दांपत्याने अातापर्यंत सुमारे दीड लाख डाॅलरची गुंतवणूक केली. त्यांनी २०१४ मध्ये DesiClick.com या नावाने पुन्हा ब्रँडिंग सुरू केली. अशा पद्धतीने हे पाेर्टल अमेरिकेतील भारतीय उत्पादनांचे वैशिष्ट्य राखणारा अमेरिकेतील सर्वात माेठा ई-काॅमर्स बाजार ठरला अाहे. या पाेर्टलवर ८५ उत्पादकांची १० हजार उत्पादने अाहेत. अन्य ग्लाेबल प्लॅटफाॅर्मवर उपलब्ध हाेणाऱ्या भारतीय उत्पादनांवर इथे लक्ष देण्यात अाले अाहे. त्या वस्तू अगदी किफायती दरात मिळतात. 
 
अाता ही संकल्पना कॅनडा, ब्रिटन अाणि अाॅस्ट्रेलियामध्ये राबवण्याचा या दांपत्याचा मानस अाहे. भारतात बंगळुरू, हैदराबाद अाणि अहमदाबादसारख्या अनिवासी भारतीय केंद्रित शहरांमध्ये व्यवसायवृद्धीच्या शक्यतांचा ते शाेध घेत अाहेत. कारण अमेरिका वगळता १० टक्के व्यवसाय स्थानिक भारतीयांकडून केला जात अाहे. त्यांना अपेक्षा अाहे की, या वर्षी ७,५०,००० डाॅलरचे उत्पन्न मिळवून २०१७ मध्ये २०० टक्के वृद्धी मिळेल. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...